शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सिंचन अनुशेष दुर करण्यासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:20 IST

अमरावती: पंतप्रधान जलसिंचन योजना व बळीराजा सिंचन योजनेत समाविष्ट प्रकल्पांना निधी मिळण्यासाठी यापुर्वीच केंद्रीय जलसंपदा मंत्र्यांची भेट घेतली. जिल्ह्यातील ...

अमरावती: पंतप्रधान जलसिंचन योजना व बळीराजा सिंचन योजनेत समाविष्ट प्रकल्पांना निधी मिळण्यासाठी यापुर्वीच केंद्रीय जलसंपदा मंत्र्यांची भेट घेतली. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना निधी कमी पडू देणार नाही असेही त्यांनी सांगितले. राज्य शासनाचा जिल्ह्यातील सिंचन अनुशेष दुर करण्याचा प्रयत्न राहणार आहे. प्रकल्प काही कारणाने बंद आहे. त्याचा आढावा मी अधिकाऱ्यांकडून घेऊन तातडीने प्रश्न निकाली काढण्याच्या सूचना दिल्या असल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. ते गुरुवारी येथील वऱ्हाडे मंगल कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते. प्रकल्पाचे काम करताना वनविभागाची परवानगी, रेल्वे क्रॉसिंगचे प्रश्न दुर करण्यात येतील असेही ते म्हणाले.

शासनाने वैनगंगा ते नळगंगा नदी जोड प्रकल्प जोडण्याचे काम हाती घेतल्याचा उल्लेखही यावेळी त्यांनी केला. कोरोना काळात सरकारच्या तिजोरीत पैसे नव्हते. पण आता परिस्थिती सुधारत आहे. केंद्र शासनाने राज्य शासनाला जीएसटीपोटी मिळणारे पैसे अद्यापही दिले नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी पत्रपरिषदेला माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख ,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खोडके, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष सुरेखा ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सुनील वऱ्हाडे, शहर अध्यक्ष राजेंद्र महल्ले , गणेश खारकर यांचीही उपस्थिती होती.

बॉक्स:

महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचाच फार्म्युला

तिन्ही पक्षाचे महाविकास आघाडी सरकार गुण्यागोविंदाने कारभार करीत आहे. होऊ घातलेल्या महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचाच फार्म्युला राहणार असल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. फक्त कार्यकर्त्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी व त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आलो असल्याचेही त्यांनी सांगितले.