शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

शिक्षणमंत्र्यांनी दिले विद्यार्थ्याच्या अटकेचे आदेश!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2019 1:57 AM

मंत्र्यांच्या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करत पोलिसांनी त्या विद्यार्थ्यास वाहनात डांबून ठेवले. मात्र, इतर विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करताच त्याला सोडून देण्यात आले.

- गणेश देशमुखअमरावती : ‘आर्थिक स्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांना इच्छा असूनही उच्च शिक्षण घेता येत नाही; सरकार त्यांना मोफत उच्च शिक्षणासाठीची सोय उपलब्ध करून देईल काय?’ हा प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्याला ‘तुला झेपत नसेल, तर तू शिकू नको. नोकरी कर’, असे अफलातून उत्तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले. शिवाय त्याचे चित्रीकरण करणा-या अन्य विद्यार्थ्याला अटक करा, असे आदेश त्यांनी दिले. त्यामुळे खळबळ उडाली आहे.ही घटना येथील शिवाजी शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात शुक्रवारी घडली. मंत्र्यांच्या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करत पोलिसांनी त्या विद्यार्थ्यास वाहनात डांबून ठेवले. मात्र, इतर विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करताच त्याला सोडून देण्यात आले. माणिकराव घवळे वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनासाठी शिक्षणमंत्री आले होते. मंत्र्यांचे भाषण संपल्यावर पत्रकारितेच्या विद्यार्थ्याने प्रश्न विचारण्यासाठी मंत्र्यांचे लक्ष वेधले. त्याकडे दुर्लक्ष करत शिक्षणमंत्री जायला निघाले. मात्र विद्यार्थ्यांनी गलका केल्यानंतर तावडे यांनी प्रश्न विचारण्यास अनुमती दिली. तेव्हा प्रशांत शिवा राठोड या विद्यार्थ्याने वरील प्रश्न विचारला. मात्र तावडे यांना तो रूचला नाही.पत्रकारिता अभ्यासक्रमाचे विद्यार्थी या प्रश्नोत्तराचे मोबाइलमध्ये शूटिंग करत होते. ही बाब लक्षात येताच तावडे यांनी शूटिंग बंद करण्यास आणि झालेले चित्रण डिलीट करण्यास सांगितले. काहींनी तसे केलेही.परंतु युवराज मनोहर दाभाडे या विद्यार्थ्याचे रेकॉर्डिंग सुरूच होते. त्याला पुन्हा रेकॉर्डींग बंद करण्यास सांगण्यात आले; तथापि हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आम्हीपत्रकारितेचे विद्यार्थी आहोत, असे बाणेदार उत्तर देत युवराजने शूटिंग सुरूच ठेवले.या प्रकारामुळे संतापलेल्या तावडे यांनी, ‘प्रायव्हसी हर्ट’ होत असल्यामुळे या विद्यार्थ्याला अटक करा, असे आदेश पोलिसांनी दिले.पोलिसांनी लगेच युवराजचा मोबाइल हिसकावून घेतला आणि त्याला वाहनात डांबून घेऊन जाऊ लागले. विद्यार्थी वाहनामागे धावत गेले. युवराजला सोडण्याचा धोशा लावला. काही शिक्षकांनी तावडे यांनाही युवराजला सोडण्याची विनंती केली.मंत्र्यांचा ताफा गेल्यानंतर पोलिसांनी युवराजला पोलीस वाहनातून उतरवून दिले; परंतु त्याचा मोबाईल परत केला नाही.या प्रकारामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्री वपोलीस कारवाईबद्दल निषेध व्यक्त केला.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडे