शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

मूकबधिर झाले डोळे, अंध झाला कान !

By admin | Updated: October 25, 2015 00:05 IST

अंध असलेला तो दोन मूकबधिरांचे कान झाला अन् मूकबधिर असलेले ते दोघे अंध मुलाचे डोळे झाले.

अशीही मिसाल : जन्मदात्यांनी नाकारले, शंकरबाबांनी घडविलेगजानन मोहोड अमरावतीअंध असलेला तो दोन मूकबधिरांचे कान झाला अन् मूकबधिर असलेले ते दोघे अंध मुलाचे डोळे झाले. धडधाकट शरीर लाभलेल्यांना भुरळ पाडणारी ही दोस्ती आज अमरावतीच्या रस्त्यावर अनुभवता आली. वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य बाल सुधारगृहातील १२३ अनाथांचा बाप असलेल्या शंकरबाबा पापळकर यांचा २३ वर्षीय मुलगा विदूर पंढरपूकरच्या विठ्ठल मंदिरात आढळला. हा अंध युवक अमरावती येथील समाजकार्य महाविद्यालयाच्या पदवी शिक्षणक्रमाचा विद्यार्थी आहे. नियमित विद्यार्थ्याप्रमाने त्याने मागील वर्षी १२वीची परीक्षा दिली. ६३ टक्के गुण मिळविले. गायनाचा छंद असलेल्या विदुरने संगीताच्या पाच परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. वझ्झर येथील समाजगृहातील अनिल व समीर हे दोन मुकबधीर युवक विदुरचे डोळे बनलेत आहेत. अंध विदूर अनिल आणि समिरची वाणी आणि कान बनला आहे. एकमेकांच्या अवयवांच्या साहाय्याने त्यांची नाना समस्यांवर मात सुरू आहे. अनिल २३ वर्षांचा. मुंबई येथील डोंगरी भागातील एका नालीत तो सापडलेला. समीर सोलापूर रेल्वे स्थानकावर आढळला. वयाच्या १८ वर्षांनंतर काय ? अमरावती : अनिल हा बालसुधार गृह परिसरातील. १० हजारांवर झाडांना नियमित पाणी देतो. मोबाईल, टिव्ही, आदी उपकरांनीची दुरुस्ती सहजरित्या करतो. सजावट व कलाकुसरीत त्याचा हातखंडा. समिर हा सकाळी सर्व मुलामुलींना उठवितो. त्यांचे दात घासून देतो. तयारी करुन देतो.अलिकडेच शंकरबाबांनी संस्थेची बरीचसी कामे विदूरवर सोपविली आहेत. पुणे येथील समाज कल्याण आयुक्तांकडे विदूर एकटाच जातो. अधिकाऱ्यांशी चर्चा करतो, असे शंकरबाबानी गौरवाने सांगितले. शासन निर्णयानुसार बाल सुधारगृहात केवळ १८ वर्षापर्यंत मुलामुलींना राहता येते. त्यानंतर या मुलींचे काय होते? हा प्रश्न हृदय हेलावणारा आहे. शंकरबाबांनी विदूरला संस्थेत काळजीवाहकपदावर नेमून त्याचे पुनर्वसन केले. अनिल व समिरचेही ते पुनर्वसन करणार आहेत.