शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

राज्यातील ४२ तालुक्यांत दुष्काळाची गंभीर स्थिती,१३४ तालुक्यांमध्ये भूजल निर्देशांक माघारला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 22:29 IST

राज्यात जुलै ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने भूजल पातळीत झपाट्याने घट आलेली आहे. दुष्काळ व्यवस्थापन संहितेच्या भूजल पातळी निर्देशांकानुसार (जीडब्लूडीआय) राज्यात २१७ तालुक्यांमध्ये भूजलाची सामान्य स्थिती असली तरी १३४ तालुक्यांमध्ये मात्र भूजलात घट झाली आहे.

 - गजानन मोहोड 

अमरावती  - राज्यात जुलै ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने भूजल पातळीत झपाट्याने घट आलेली आहे. दुष्काळ व्यवस्थापन संहितेच्या भूजल पातळी निर्देशांकानुसार (जीडब्लूडीआय) राज्यात २१७ तालुक्यांमध्ये भूजलाची सामान्य स्थिती असली तरी १३४ तालुक्यांमध्ये मात्र भूजलात घट झाली आहे. भुजल सर्वेक्षण विभागाच्या निरीक्षण विहिरीच्या नोंदीची यापूर्वीच्या १० वर्षांच्या भूजलपातळीशी तुलना केली असता हे निरीक्षण नोंदविण्यात आले. यामध्ये सात तालुक्यात अतीगंभीर, ४२ तालुक्यात गंभीर तर  स्वरूपाचा तर ८५ तालुक्यात मध्यम स्वरुपात भुजलात कमी आलेली आहे.नव्या दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रामुख्याने पर्जन्यमान, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता निर्देशांक, जलविषयक निर्देशांक यासोबत पिकांचे क्षेत्रिय सर्वेक्षण विचारात घेतल्या जाते. अनिवार्य निर्देशांकामुळे २०१ तालुक्यांत दुष्काळाचा प्रथम ट्रिगर लागल्यानंतर या सर्व तालुक्यात मृदु आर्द्रता निर्देशांकानुसार दुष्काळाची क्रमवारी निश्चित करण्यात आली. त्यानंतरच्या जलविषयक निर्देशांकांमध्ये राज्यातील सर्व जलसाठ्या संदर्भात पुरेशी माहिती उपलब्ध नसल्यामुळे दुष्काळी परिस्थितीचे मुल्यमापन करण्यासाठी भूजल पातळी निर्देशांकाचा वापर करण्यात आला. त्यानुुसार राज्याच्या ३३ जिल्ह्यांमधील ३५१ तालुक्यातील भूजल पातळीचे निरीक्षण विहिरीतील पातळीच्या आधारे निरीक्षण करण्यात आले. यामध्ये हा धक्कादायक नित्कर्ष नोंदविण्यात आला. या ठिकाणी आता चाºयाची उपलब्धता, पिण्याच्या पाण्याची टंचाई, रोजगाराची वाढती मागणी व रोजगारासाठी लोकांचे स्थलांतर आदी विषयक माहिती सबंधित जिल्ह्यांकडून मागविण्यात येणार आहे

भूजल पातळी निर्देशांकानुसार बाधित तालुकेराज्यात ३५१ तालुक्यापैकी २१७ तालुक्यात स्थिती सामान्य आहे. मात्र, १३४ तालुक्यातील भुजलस्तर कमी झालेला आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यात सहा तालुके, अकोला २, अमरावती ३, औरंगाबाद ३, बीड ८, बुलडाणा ९, चंद्रपूर ४, धुळे १, जळगाव ३ जालना ४, लातूर ४, नागपूर ६, नांदेड ३, नंदूरबार ४, नाशिक ७, उसमानाबाद ८, परभनी २, पुणे ७, रायगड ११, रत्नागिरी ३, सांगली ७, सातार २, सिंधुदूर्ग १, सोलापूर ११, ठाणे/पालघर १३, वर्धा १व यवतमाळ जिल्ह्यातील १ तालुका भूजल पातळी निर्देशांकात माघारला आहे.

टॅग्स :droughtदुष्काळMaharashtraमहाराष्ट्र