शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही पायांनी अपंग रूपा देतेय दहावीची परीक्षा

By admin | Updated: March 10, 2017 00:22 IST

नजीकच्या वझ्झर येथील अंबादासपंत वैद्य बालगृहातील रुपा ही दोन्ही पाय नसलेली मुलगी दहावीची परीक्षा देत

जिद्दीची कहाणी : शंकरबाबांची मानसकन्यापरतवाडा : नजीकच्या वझ्झर येथील अंबादासपंत वैद्य बालगृहातील रुपा ही दोन्ही पाय नसलेली मुलगी दहावीची परीक्षा देत असून अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकरांची मानसकन्या असलेल्या रूपाची जिद्द आणि चिकाटीचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे. जन्मत:च दोन्ही पाय नसलेल्या रूपाचा एक वर्षाची असतानाच जन्मदात्यांनी त्याग केला. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर परिसरात बेवारस आढळलेल्या रूपाला बाल न्यायालयाच्या आदेशाने पोलिसांनी वझ्झर येथील बालगृहात दाखल केले. येथे तिला शंकरबाबा पापळकरांच्या रूपाने वडील मिळाले आणि सन्मानाचे जीवनसुद्धा तिच्या वाट्याला आले. सद्यस्थितीत अमरावती येथील श्री हव्याप्र मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकर वैद्य तिच्या शिक्षणाचा खर्च करीत आहेत. रूपाचे प्राथमिक शिक्षण येथील नगरपरिषद प्राथमिक मराठी शाळेत झाले आणि माध्यमिक शिक्षण आय.एस. गर्ल्स स्कूल परतवाडा येथे झाले. आता ती दहावीची परीक्षा देत आहे. याच बालगृहातील एक अनाथ मुलगी मंजुळा शंकरबाबा पापळकरसुद्धा रूपाची जिव्हाळ्याने काळजी घेतात. तिला नियमित शाळेत ने-आण करण्याचे कामही मंजुळाच स्वेच्छेने करते. ७ मार्च रोजी सकाळी १० वाजता परीक्षा केंद्रावर गेली असता म्युन्सिपल हायस्कूलच्या शिक्षकांनी रूपाचे स्वागत करून शुभेच्छा दिल्यात. (तालुका प्रतिनिधी)