दारूड्या स्वयंघोषित नेत्याने म्हशींपुढे ठोकले भाषण
By Admin | Updated: May 5, 2014 00:20 IST2014-05-05T00:20:41+5:302014-05-05T00:20:41+5:30
‘माझ्या बंधू आणि भगिनींनो.. तुम इन्सानों से तो यह बेजुबान जानवर अच्छे है..ये नेता कोई काम के नही...महागाई किती वाढली..जनावरांना चारा मिळत नाही.

दारूड्या स्वयंघोषित नेत्याने म्हशींपुढे ठोकले भाषण
अचलपूर ‘माझ्या बंधू आणि भगिनींनो.. तुम इन्सानों से तो यह बेजुबान जानवर अच्छे है..ये नेता कोई काम के नही...महागाई किती वाढली..जनावरांना चारा मिळत नाही..त्याचे दरही वाढले आहेत..सगळा चारा बिहारात लालू प्रसाद यादवांनी खाऊन टाकला..’ म्हशींच्या कळपापुढे दारू पिऊन झिंगलेल्या स्वयंघोषित नेत्याच्या तासभर चाललेल्या भाषणाने येणाºया-जाणाºया प्रवाशांचे व वाहनधारकांचे चांगलेच मनोरंजन झाले. मध्येच हा स्वयंघोषित नेता तोंडाने शिट्या वाजवीत परिसरातील वाहतूकही नियंत्रित करीत होता. परतवाडा शहरातील पांढºया पुलावर एक तास हा ‘तमाशा’ चांगलाच रंगला. पांढरा पूल चौकावरील वळण रस्ता दर्शविणाºया चबुतºयावर चढू लागला. चढण्याच्या प्रयत्नात तो दोन वेळा खाली कोसळला. तिसºयांदा कसाबसा वर चढला आणि तोल सावरत उभा झाला.