शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील 54 तालुक्यात मोबाइल अॅपद्वारे दुष्काळाचे सर्वेक्षण होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 17:39 IST

प्रत्येक तालुक्यातील 10 गावे रँडम पद्धतीने निवडणार

गजानन मोहोडअमरावती - सरासरीपेक्षा कमी पाऊस व तीन आठवड्याचा खंड यामुळे विदर्भातील 54 तालुक्यांना दुष्काळाचा प्रथम ट्रिगर लागू झाला आहे. त्यामध्ये नागपूर विभागातील 22, तर अमरावती विभागातील 31 तालुक्यांचा समावेश आहे. मात्र, दुष्काळाच्या दुसऱ्या ट्रिगरसाठी संबंधित तालुक्यांतील 10 गावे रँडम पद्धतीने निवडून विहित मापदंडानुसार सर्वेक्षण करावे लागणार आहे. कृषी आयुक्तांनी याविषयीचे निर्देश देऊन 21 ऑक्टोबरच्या आत अहवाल मागितला आहे.

शासनाने आता दुष्काळ घोषित करण्यासाठी 7 ऑक्टोबर 2017 च्या निकषाप्रमाणे नवी कार्यपद्धती निश्चित केली आहे. त्यानुसार खरिपाचा दुष्काळ 31 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. विदर्भातील 10 तालुक्यात सरासरीपेक्षा 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस आहे. या तालुक्यात रँडम पद्धतीने 10 गावे जिल्हाधिकारी निश्चित करतील व गावातील प्रमुख पिकांचा सर्व्हे/गट नंबर ठरविताना गावातील एकूण सर्व्हे व गट नंबरची संख्या विचारात घेतली जाणार आहे. या संख्येमधून रँडम पद्धतीने हा गट निवडण्यात येणार आहे. हे पीक एक हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर असल्याची खात्री करण्यात येणार आहे. या गटामधील पीक, शेतकऱ्यांची माहिती, पिकाची सद्यस्थिती, पिकांचे फोटो याविषयीची माहिती मोबाइल अ‍ॅपवर अपलोड करावी लागणार आहे. खरीप हंगामातील पिकांची कापणी करण्यापूर्वी अशाप्रकारे सर्वेक्षण करावे लागणार आहे. त्यानंतर ऑक्टोबरअखेर शासन खरिपाचा दुष्काळ जाहीर करणार आहे.

टॅग्स :droughtदुष्काळVidarbhaविदर्भMobileमोबाइल