शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
2
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
3
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
4
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
5
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
6
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
7
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
8
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
9
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
10
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
11
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
12
DC vs CSK : वाऱ्यानं बेल्स पडल्या, मग Nitish Rana आउट कसा? डेड बॉल का नाही? नियम काय सांगतो?
13
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
14
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
15
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
16
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
17
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
18
अजबच! एकाच आईच्या जुळ्या मुली, पण दोघींचेही वडील वेगवेगळे; DNA रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा
19
कोकणात उद्धवसेनेला आणखी एक धक्का बसणार, सनसनाटी विजय मिळवणारा नेता शिंदेसेनेच्या वाटेवर
20
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवक आंदोलनावर तोडगा काढा : मनोहर जाधव

By admin | Updated: July 3, 2015 00:38 IST

जिल्हाभरातील ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन मागील आठवड्यापासून सुरु आहे. परिणामी शैक्षणिक सत्र व कृषी कामासह नागरिकांना आवश्यक असलेले दाखले

अचलपूर : जिल्हाभरातील ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन मागील आठवड्यापासून सुरु आहे. परिणामी शैक्षणिक सत्र व कृषी कामासह नागरिकांना आवश्यक असलेले दाखले मिळण्याची प्रक्रियाच ठप्प झाल्यामुळे नागरिकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याचा विकासकामांवर परिणाम झाल्याने ग्रामसेवकांच्या आंदोलनाचा तोडगा काढण्याची मागणी अचलपूर सरपंच संघटनेचे अध्यक्ष मनोहर जाधव यांनी केले आहे.ग्रामसेवकांनी अंजनगाव तालुक्यातील निलंबित ग्रामसेवकाला पुन्हा कामावर रुजू करण्यासह इतर काही मागण्यांसाठी जिल्हाभर कामबंद आंदोलन पुकारले आहे. मागील आठ दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनाचा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. शैक्षणिक सत्रामध्ये शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले मिळणे बंद झाले आहे. शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक असलेले दाखलेसुध्दा लाभार्थ्यांना मिळत नाहीत. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून नापिकीचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे. ग्रामसेवकांच्या कामबंद आंदोलनामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांची परवड होत आहे. या बाबीचा विचार करून आंदोलनावर तोडगा काढण्याची मागणी होत आहे. योग्य तोडगा काढून ग्रामसेवकांना पुन्हा कामावर रुजू करण्यासाठी पर्याय शोधण्याची मागणी अचलपूर सरपंच संघटनेचे अध्यक्ष मनोहर जाधव यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)