‘उघडली मंदिराची दारे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2021 05:00 AM2021-10-08T05:00:00+5:302021-10-08T05:00:52+5:30

जिल्हाधिकारी पवनीत कौर व महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी पहाटे अंबादेवी मंदिरात दर्शन घेऊन सुरक्षाविषयक बाबींची पाहणी केली.  प्रथेनुसार भक्त आधी अंबादेवीचे दर्शन घेतात व नंतर एकवीरा देवीचे दर्शन घेतात. त्यानुसारच दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे, जेणेकरून गर्दी टाळली जाईल. कोरोना नियमांचे पालन करून सॅनिटायझर व थर्मल स्क्रीनिंग करूनच मंदिरात प्रवेश दिला जात आहे. देवीच्या ओटीची व्यवस्था प्रवेशद्वारावर करण्यात आली आहे. 

‘Doors of the temple opened’ | ‘उघडली मंदिराची दारे’

‘उघडली मंदिराची दारे’

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनामुळे बंद असलेली मंदिराची दारे गुरुवारी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर उघडली. या अनुषंगाने अमरावती शहरात भक्त गुरुवारी पहाटेपासूनच श्री अंबादेवी व श्री एकवीरादेवी मंदिराच्या महाद्वारासमोर उत्साहात दार उघडण्याच्या प्रतीक्षेत होते. जिल्हाभरातील देवी-देवतांची दीड वर्षांपासून बंद असलेली मंदिरे पुन्हा गजबजली. भाविकांनी याबाबत आनंद व्यक्त केला. 
जिल्हाधिकारी पवनीत कौर व महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी पहाटे अंबादेवी मंदिरात दर्शन घेऊन सुरक्षाविषयक बाबींची पाहणी केली.  प्रथेनुसार भक्त आधी अंबादेवीचे दर्शन घेतात व नंतर एकवीरा देवीचे दर्शन घेतात. त्यानुसारच दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे, जेणेकरून गर्दी टाळली जाईल. कोरोना नियमांचे पालन करून सॅनिटायझर व थर्मल स्क्रीनिंग करूनच मंदिरात प्रवेश दिला जात आहे. देवीच्या ओटीची व्यवस्था प्रवेशद्वारावर करण्यात आली आहे. 
अंबादेवी मंदिरात पहाटे ५ वाजता रवींद्र कर्वे व त्यांची पत्नी यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. या पूजेसाठी योगेश जोशी, विनोद जोशी, राजू जोशी, मिलिंद देवघरे उपस्थित होते. एकवीरादेवी मंदिरातील घटस्थापना राजेद्र डंबे व पत्नी यांच्या हस्ते पार पडली. यावेळी पूजेसाठी श्रीपाद जोशी, नरहरी पुरानिक, श्रीहरी पांडे, दीपक पाठक उपस्थित होते.

अंबादेवी मंदिर सकाळी ६ ते रात्री ८.३० या वेळेत खुले राहणार आहे. दुपारी १२ ते १२:३० या वेळेत मंदिर सॅनिटाईझ करण्यासाठी बंद राहील. यावेळी मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. 
- विलास मराठे
 विश्वस्त, अंबादेवी मंदिर ट्रस्ट.

मंदिर उघडण्यापूर्वी भाविकांची रांग होती. मंदिर परिसरात गर्दी होऊ नये. म्हणून महिला व पुरुषांची स्वतंत्र रांगेची व्यवस्था करण्यात आली. मंदिर पहाटे ५ ते रात्री १० वाजेपर्यंत खुले राहणार आहे.
- चंद्रशेखर कुलकर्णी 
कोषाध्यक्ष, एकवीरादेवी मंदिर

नवरात्रोत्सवात यात्रा नसली तरी येणाऱ्या लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस विभागाकडून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला आहे. या परिसरात पोलिसांच्या दोन चौकी आहेत.
- डॉ. आरती सिंह 
पोलीस आयुक्त

Web Title: ‘Doors of the temple opened’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.