शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राचा ‘उडता पंजाब’ करू नका; तरुणांचे आयुष्य बरबाद करणारा प्रकार थांबवणे गरजेचे - पटोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 12:28 IST

प्रदेश काँग्रेस कमिटीची अमरावती विभागाची आढावा बैठक

अमरावती : नाशिकमधले ड्रग्जचे लोण अमरावतीसारख्या शहरातही पसरत आहे. शाळा, कॉलेजमधील मुलांना ड्रग्जच्या विळख्यात ओढले जात आहेत, हे अत्यंत गंभीर आहे. नाशिक ड्रग्ज प्रकरणाची जबाबदारी सरकारने स्वीकारली पाहिजे. तरुणांचे आयुष्य बरबाद करणारा हा प्रकार थांबवणे गरजेचे आहे. महाराष्ट्राचा ‘उडता पंजाब’ करू नका, असे आवाहन करत राज्यकर्त्यांच्या आशिर्वादाशिवाय ड्रग्ज तस्करी अशक्य आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

प्रदेश काँग्रेसची आढावा बैठक अमरावतीमध्ये पार पडली, त्यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रसार माध्यमांशी बोलत होते. ड्रग माफिया ललित पाटील याला ससून रुग्णालयातून फरार करण्यात कोणी मदत केली, हे समोर येत आहे. ती माहिती आमच्याकडे आहे, योग्य वेळी ती आम्ही जाहीर करू; परंतु तरुणांच्या आयुष्याशी खेळणाऱ्यांना कोणीही पाठीशी घालू नये, असे ते म्हणाले. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा आढावा घेण्याचे काम सध्या सुरू असून, अमरावती विभागातील जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. अमरावतीच्या आढावा बैठकीत माजी मंत्री तथा आमदार यशोमती ठाकूर, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे, आ. बळवंत वानखेडे, अमरावती ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, अमरावतीचे प्रभारी नाना गावंडे आदी उपस्थित होते.

जागा वाटपाचा निर्णय मेरिटनुसार

जागा वाटपाच्या प्रश्नावर महाविकास आघाडीमध्ये चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या पक्षाने जागा लढवावी, अशी मागणी करत असतात, ते योग्यच आहे; पण मेरिटनुसार जागा वाटपाचा निर्णय घेतला जाणार आहे. कोणत्या पक्षाला कोणता मतदारसंघ मिळेल, यापेक्षा मविआच्या उमेदवाराला निवडून आणायचे आहे. लोकशाही व्यवस्था मान्य नसलेल्या भाजपाला सत्तेबाहेर काढणे, हेच आमचे काम असल्याचे पटोले म्हणाले.

महाराष्ट्र लुटून सुरतेला दान

व्हायब्रंट गुजरातबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे लोक आहोत, शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सुरतेला लुटले होते; पण आजचे सत्ताधारी महाराष्ट्र लुटून सुरतेला देत आहेत. सरकारमधले लोक गुजरातचे हस्तक आहेत, हे त्यांनीच जाहीरपणे सांगितलेले आहे, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसDrugsअमली पदार्थMaharashtraमहाराष्ट्र