शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
4
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
5
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
6
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
7
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
8
Ear Piercing: बाळाचे कान टोचण्यामागची 'ही' वैज्ञानिक कारणे तुम्हाला माहीत आहेत का?
9
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
10
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
11
४ वेळा SSC, दोनदा UPSC दिली, आजारपणातही जिद्द नाही सोडली, शेतकऱ्याचा मुलगा बनला CBI अधिकारी
12
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
13
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
14
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
15
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
16
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
17
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
18
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
Daily Top 2Weekly Top 5

घाबरु नका, इतरांनाही घाबरुन देऊ नका!

By admin | Updated: February 14, 2015 23:59 IST

‘स्वाईन फ्लू’ या जीवघेण्या आजाराने देश, राज्य पातळीवर डोके वर काढले असले तरी आरोग्य विभागाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत.

अमरावती : ‘स्वाईन फ्लू’ या जीवघेण्या आजाराने देश, राज्य पातळीवर डोके वर काढले असले तरी आरोग्य विभागाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. जिल्हा प्रशासन युद्धस्तरावर स्वाईन फ्लूची दखल घेत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ज्या तिघांचा मृत्यू झाला, ते स्वाईन फ्लूनेच दगावल्याचे अधिकृतपणे सिद्ध झाले नाही. त्यामुळे या आजाराबाबत घाबरु नका, इतरांनाही घाबरुन देऊ नका, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शनिवारी येथे पत्रपरिषदेत केले.जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य अधिकाऱ्यांची उशिरा सायंकाळी आढावा बैठक पार पडली. ना. पोटे यांनी स्वाईन फ्लूच्या उपाययोजनेबाबत इत्यंभूत माहिती दिली. टॅमी फ्लूच्या २५ हजार ५०० गोळ्यांचा साठा असून कीट्ससुध्दा उपलब्ध आहे. इर्विनमध्ये वॉर्ड नं. ९ हा स्वाईन फ्लूचा स्वतंत्र कक्ष आहे. जिल्ह्यातील ५६ आरोग्य केंद्रात रुग्णांची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहे. स्वाईन फ्लू हा आजार जीवघेणा असला तरी जिल्ह्यात या आजाराचे फारसे पडसाद उमटले नाही. यापूर्वी जे तीन रुग्ण दगावले ते स्वाईन फ्लूमुळे दगावल्याचे स्पष्ट झाले नाही. नवीन तीन रुग्णांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहे. स्वाईन फ्लूची लस बाजारात विकत असल्याच्या तक्रारीकडे लक्ष वेधले असता, याबाबत कोणतेही लस उपलब्ध नसल्याचे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी स्पष्ट केले. हा काळाबाजार रोखण्यासाठी पथक गठित करणार, असे ते म्हणाले. वराहांचा हैदोस, कचरा, सांडपाणी याबाबत तातडीचे बैठक घेतली जाणार असे ना. पोटे म्हणाले. पाणी पुरवठ्याचा प्रश्न निकाली काढला जाईल, असे ते म्हणाले. पत्रपरिषदेला जिल्हाधिकारी किरण गित्ते, तेजुसिंग पवार, निवेदिता चौधरी, अरुण राऊ त आदी उपस्थित होते.