शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील 'वारली पेंटिंग' सातासमुद्रापार; २८ देशांच्या दूतावासांकडे शुभेच्छापत्रे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2021 18:07 IST

दिवाळी शुभेच्छापत्रांच्या दर्शनी पृष्ठभागावर महाराष्ट्राची ओळख असलेली वारली पेंटिंग आदिवासी विद्यार्थ्यांनी काढली. त्यावर दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा असा संदेश देत ही शुभेच्छापत्रे पोस्टाद्वारे साता समुद्रापार २८ देशांच्या दूतावासांकडे रवाना झाली आहेत.

ठळक मुद्देआदिवासी विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम : पंतप्रधान मोदींना दिवाळीची शुभेच्छापत्रे

लोकमत विशेष

नरेंद्र जावरे

अमरावती : शिक्षकांना विषय सुचला, आदिवासी विद्यार्थ्यांच्या हातात कुंचला दिला नि महाराष्ट्राची ओळख असलेली वारली पेंटिंग कागदावर चितारण्यात आली. इवल्याशा हातांनी साकारलेली दिवाळीची शुभेच्छापत्रे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ते गावातील सरपंचपासून थेट सातासमुद्रापार अमेरिकासारख्या देशातील मान्यवरांना त्या-त्या देशांच्या दूतावासामार्फत मेळघाटातून पाठवली जात आहेत.

चिखलदरा तालुक्याच्या जैतादेही येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी हा अभिनव उपक्रम राबविला. पोस्टाद्वारे ही शुभेच्छापत्रे २८ देशांच्या दूतावासांकडे रवाना झाली आहेत. या शाळेने यापूर्वीसुद्धा राज्यस्तरावर मग्रारोहयो अंतर्गत परसबाग, फळबाग व जैवविविधता हा अभिनव उपक्रम राबविला होता. पुन्हा या शाळेने दिवाळीनिमित्त आदिवासी विद्यार्थ्यांना शुभेच्छापत्रे बनविणे शिकवून त्यात भर घातली. शिक्षक गणेश जामूनकर, जितेंद्र राठी, शुभांगी येवले यांनी इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या एकूण ८७ विद्यार्थ्यांच्या हाताने हे कार्य केले आहे. इतरही विद्यार्थ्यांना हा उपक्रम प्रेरणादायी ठरला आहे.

वारली पेंटिंग महाराष्ट्राची ओळख

दिवाळी शुभेच्छापत्रांच्या दर्शनी पृष्ठभागावर महाराष्ट्राची ओळख असलेली वारली पेंटिंग आदिवासी विद्यार्थ्यांनी काढली. त्यावर दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा असा संदेश देत पोस्टाद्वारे साता समुद्रापार महाराष्ट्राची ओळख पाठविली गेली आहे.

शाळेमार्फत विविध उपक्रम राबविले जातात. तिन्ही शिक्षकांनी हा अभिनव उपक्रम राबविण्याचे ठरविले आणि आदिवासी चिमुकला विद्यार्थ्यांकडून वारली पेंटिंग शुभेच्छापत्रे तयार करून ती आता देशाचे पंतप्रधान सातासमुद्रापार व मान्यवरांना पोस्टद्वारे पाठविला जात आहेत.

- गणेश जामूनकर, शिक्षक, जिल्हा परिषद शाळा, जैतादेही, ता. चिखलदरा

टॅग्स :Educationशिक्षणpaintingचित्रकलाcultureसांस्कृतिकDiwaliदिवाळी 2021