तिवसा कोविड रुग्णालयाला जिल्हाधिकाऱ्यांची आकस्मिक भेट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:14 IST2021-04-27T04:14:07+5:302021-04-27T04:14:07+5:30
तिवसा : जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी २६ एप्रिल रोजी तिवसा तालुक्याला भेट देऊन सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना कोरोनाबाबत निर्देश दिले. ...

तिवसा कोविड रुग्णालयाला जिल्हाधिकाऱ्यांची आकस्मिक भेट!
तिवसा : जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी २६ एप्रिल रोजी तिवसा तालुक्याला भेट देऊन सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना कोरोनाबाबत निर्देश दिले.
तिवसा तालुक्यातील वाढते रुग्ण व सोबतच मृतांची आकडेवारी बघता जिल्हाधिकारी दुपारी १२ वाजता दरम्यान तिवसा येथे धडकले. तहसीलदार वैभव फरतारे, समवेत पंचायत समितीमधील आरोग्य नियंत्रण कक्ष व रुग्णालयाची पडताळणी करून योग्य सेवा देण्याच्या हेतूने सूचना दिल्या. यावेळी तिवसा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक पवन मालुसरे, तालुका आरोग्य अधिकारी जोत्सना पोटपिटे, तिवसाच्या ठाणेदार रिता उईके उपस्थित होत्या. यावेळी तिवसा कोविड रुग्णालयात अधिक ३० बेडची तातडीने व्यवस्था करण्याचे निर्देश दिल्याने प्रशासन कामी लागले आहे. तिवसा शहरात जिल्हाधिकारी पोहोचताच अनेक नागरिक काहीही कारण नसताना भटकंती करताना व त्यातही मास्कचा वापर करीत नसल्याचे दिसून आल्याने लॉकडाऊनची अंमलबजावणी आपल्या पद्धतीने करणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना सूचित केले. काही काळ शहरात तारांबळ उडाली होती.