जिल्हाधिकारी पवनीत कौर यांची प्रथमच चांदूर रेल्वेला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:11 IST2021-07-21T04:11:13+5:302021-07-21T04:11:13+5:30
एसडीओ आणि तहसिल कार्यालयाचा घेतला आढावा एसडीओ आणि तहसिल कार्यालयाचा घेतला आढावा चांदूर रेल्वे - (ता. प्र.) अमरावतीच्या नवनियुक्त ...

जिल्हाधिकारी पवनीत कौर यांची प्रथमच चांदूर रेल्वेला भेट
एसडीओ आणि तहसिल कार्यालयाचा घेतला आढावा
एसडीओ आणि तहसिल कार्यालयाचा घेतला आढावा
चांदूर रेल्वे - (ता. प्र.)
अमरावतीच्या नवनियुक्त जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी मंगळवारी प्रथमच चांदूर रेल्वेला भेट देऊन एसडीओ आणि तहसिल कार्यालयाचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी पवनीत कौर चांदूर रेल्वे शहरात आल्यानंतर प्रथम त्यांनी ग्रामिण रूग्णालयाला भेट देऊन ऑक्सिजन प्लांटची पाहणी केली. तसेच ग्रामिण रूग्णालयातील कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शामसुंदर निकम, वैद्यकिय अधिक्षक डॉ. प्रफुल्ल मरसकोले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रियंका निकोसे यांची उपस्थिती होती. यानंतर एस.टी. डेपोच्या मागील बाजुने असलेल्या शासकीय वसतीगृहातील कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली व तेथील व्यवस्थेबाबत माहिती घेतली. तेथून जिल्हाधिकारी ह्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात पोहचल्या. उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी यांच्याकडून त्यांनी उपविभागाचा संक्षिप्त आढावा घेतला. तसेच तहसिलदार राजेंद्र इंगळे यांच्याकडून सुध्दा तालुक्याचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी नायब तहसिलदार श्री. अनासाने, श्री. तिवारी, श्री. मळसणे, मंडळ अधिकारी अमोल देशमुख, सतिष गोसावी, निलेश स्थुल, शेषराव लंगडे यांसह महसुल कर्मचारी उपस्थित होते.
(बॉक्समध्ये घेणे)
मतदारयादीतील दुबार नावे तपासण्याचे दिले आदेश
चांदूर रेल्वे शहरात मतदार यादीमध्ये दुबार नावे असलेला विषय सद्या गाजत असुन याप्रकरणी आप नेते नितीन गवळी यांनी तक्रारी सुध्दा केल्या आहे. मात्र प्रशासनाकडून ठोस पाऊले उचलल्या जात नसतांना शहरातील पत्रकारांनी नवनियुक्त जिल्हाधिकारी यांना याबाबतचा प्रश्न विचारला. यावर जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी एसडीओ इब्राहीम चौधरी यांना रँडमली मतदार यादी तपासण्याचे आदेश दिले असुन त्यामध्ये दुबार नावे आढळल्यास त्यानंतर पुढील प्रक्रीया करणार असल्याचे सांगितले.
200721\img-20210720-wa0054.jpg
photo