शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

जिल्हा वार्षिक योजनेतून होणार अंगणवाडींची कामे;  शौचालय बांधकाम व दुरुस्तीसाठी मिळणार निधी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2017 5:09 PM

अंगणवाडी बालकांना हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा वार्षिक निधीतून जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) मधून इमारतीची कामे केली जाणार आहेत. अंगणवाडी शौचालय बांधकामे व अंगणवाडी इमारतींच्या किरकोळ  दुरुस्तीच्या कामांना शासनाने परवानगी दिली आहे.

-  जितेंद्र दखने

अमरावती : अंगणवाडी बालकांना हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा वार्षिक निधीतून जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) मधून इमारतीची कामे केली जाणार आहेत. अंगणवाडी शौचालय बांधकामे व अंगणवाडी इमारतींच्या किरकोळ  दुरुस्तीच्या कामांना शासनाने परवानगी दिली आहे. इमारत उभारण्यासाठी  शासनाच्यावतीने जिल्हा वार्षिक निधीतून  ४ कोटी २३ लाख ६० हजारांची मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हा वार्षिक योजनेमधून अंगणवाडी बांधकामासाठी लेखाशीर्ष उपलब्ध नसल्यामुळे  निधी अर्थसंकल्पित करण्यासाठी अडचणी येत होत्या. दरम्यान, शासननिर्णयामुळे सन २०१७-१८ पासून अंगणवाडी बांधकामासाठी राज्यस्तरावर ४ कोटी २३ लाख ६० हजार रुपयांची तरतूद  करण्यात आली आहे तसेच केंद्र शासनाकडून इमारत बांधकामासाठी ६० टक्के आणि राज्य शासनाच्या ४० टक्के निधीद्वारा कामास प्राधान्य देण्यात येणार आहे. शासनाच्या धोरणानुसार  जिल्हा वार्षिक निधीतून नवीन अंगणवाडी बांधकामाबरोबरच जुन्या अंगणवाड्यांमध्ये शौचालय नसणा-या ठिकाणी शौचालयाची कामे तातडीने करण्यात येणार आहे. नवीन अंगणवाडी बांधकाम, अंगणवाडी शौचालय, इमारतीच्या किरकोळ दुरुस्तीच्या सुधारणेस मान्यता देण्यात आली आहे. अंगणवाडी दुरुस्ती तसेच ज्या अंगणवाडीमध्ये शौचालय नाही, अशा ठिकाणी बांधकामासाठी ५० टक्के निधी खर्च करण्यात येणार आहे. दरम्यान, जि.प. महिला व बालविकास अधिकारी यांच्या मान्यतेने अंगणवाडी बांधकामासाठी अर्थसंकल्पित केलेल्या निधीतून ५० टक्के प्रमाणे विभागणी करून घेणयत येणाºया कामाचा आराखडा तयार करून जिल्हाधिकारी यांच्याकडून निधी उपलब्ध करून घेण्यात यावा तसेच वित्तीय वर्ष संपण्याचा कालावधी विचारात घेऊन तातडीने कामाचे नियोजन करण्याच्या सूचना राज्याच्या महिला व बाल विकास विभागाने दिल्या आहेत. ज्या अंगणवाड्यांंमध्ये शौचालये नाहीत, अशा ठिकाणी शौचालयाची बांधकामे प्राधान्याने घ्यावीत, अंगणवाडी इमारतीमधील किरकोळ दुरुस्तीची कामे  करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. मात्र, ही कामे करताना शासनाने ठरवून दिलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून अंगणवाडीचे कामे मंजूर करावे, अशा स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत. अंगणवाडी केंद्राच्या किरकोळ दुरुस्ती व शौचालयाची कामे करण्याबाबत शासनाचे आदेश मिळाले आहेत. त्यानुसार शासननिर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे अमरावती जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कै लास घोडके यांनी सांगितले.बंद शौचालय सुरू होणारशासनाच्या नवीन निर्णयामुळे जिल्हा वार्षिक निधीतून (डिपीसी) अंगणवाडी केंद्राची कामे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तसेच शौचालय दुरुस्ती आणि किरकोळ दुरुस्तीसाठीही निधी उपलब्ध झाला आहे. परिणामी वर्षानुवर्षे दुरुस्तीअभावी रखडणाºया अंगणवाड्या सुस्थितीत येणार आहेत. याशिवाय शौचालयावर पाणी टाकी उपलब्ध करून देण्यासाठीही निधी देण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी साठवणीअभावी बंद असलेली शौचालये सुरू होणार आहेत.

टॅग्स :SchoolशाळाAmravatiअमरावती