शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

संभाव्य तापमानवाढीत जिल्हा आठव्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 1:16 AM

वातावरण बदलासाठी जिल्हा अतिसंवेदशील असल्याची माहिती पर्यावरण विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाली आहे. राज्य शासनाने टेरी (द एनर्जी अ‍ॅन्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट) व युके मेट आॅफिस या संस्थेच्या माध्यमातून आगामी ५० वर्षांत राज्यातील वातावरणीय बदल अनुकरण धोरण जाहीर केले.

ठळक मुद्दे‘टेरी’चा अलर्ट : वातावरणीय बदल, अतिसंवेदनशीलमध्ये राज्यात १६ वा

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वातावरण बदलासाठी जिल्हा अतिसंवेदशील असल्याची माहिती पर्यावरण विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाली आहे. राज्य शासनाने टेरी (द एनर्जी अ‍ॅन्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट) व युके मेट आॅफिस या संस्थेच्या माध्यमातून आगामी ५० वर्षांत राज्यातील वातावरणीय बदल अनुकरण धोरण जाहीर केले. यात जिल्ह्याची स्थिती जाहीर करण्यात आली. ही आगामी काळासाठी धोक्याची घंटा आहे.वातावरणीय बदलामुळे अनियमित पाऊस, तीव्र दुष्काळ, मोठे पूर, जमिनीतील पोषक द्रवाचा असमतोल, वॉटर लॉगींग, अन्न सुरक्षा, रोगराईत होणारी वाढ, जंगलाची वैविधता व ºहास, उत्पादकता, पाण्याची उपलब्धता, उपयुक्तता व मासेमारीवर विपरीत परिणाम होत आहे. आकस्मिक अतिवृष्टी होऊन पूर येणे किंवा काही ठिकाणी दुष्काळ पडणे, अशा घटनांच्या पुनरावृत्तीत वाढ झाली, ही चिंतेची बाब आहे. प्रामुख्याने शेती, अन्न सुरक्षा, आरोग्य, जंगल जलस्त्रोत, नैसर्गिक अधिवास, जैवविविधता, उपजिविकेची साधने, पायाभूत सुविधा आदींवर होणाऱ्या परिणामांची शहानिशा करून ते कमी कसे करता येतील यासाठी क्षेत्रनिहाय अनुकूल धोरणे ठरविण्यास पर्यावरण विभागाने मान्यता दिली आहे.राज्याची भौगोलिक स्थिती आणि स्थान लक्षात घेऊन स्थानिक परिस्थितीत होणाºया वातावरणीय बदलाचे शास्त्रोक्त अनुमान काढण्यासाठी राज्यात रिजन क्लायमेट मॉडेलिंग सिस्टम आणि एचएडीआरएमपी या दोन मॉडेलची निवड करून १९७० ते २००० या कालखंडातील सरासरी तापमानतापमानातील बदलांच्या पार्श्वभूमीवर २१ व्या शतकातील सन २०३०, सन २०५० व सन २०७० या कालखंडामध्ये होणाºया वातावरणीय बदलाचे शास्त्रोक्त अनुमान काढण्याचे काम हाती घेतले होते.आगामी काळासाठी धोरणात्मक शिफारसीत्रिस्तरीय वनांमुळे पावसाचे पाणी मुरण्यासाठी डोंगराची क्षमतावाढ होऊन पुराची तीव्रता कमी होईल, नदी वर्षभर प्रवाही राहून भूजल पातळी वाढेल, यामध्ये लोकसहभागाने पेमेंट सिस्टीमचा अवलंब करता येईल.बदलत्या वातावरणात वाढू शकेल व तग धरू शकतील, अशी पिके व फळ जातीच्या संशोधनास, लागवडीस प्रोत्साहन देणे, पारंपरिक पिकांचे संवर्धन करणे, उपजिविकेची साधणे निर्माण करणेसौर वॉटरपंप, पवनऊर्जा, आदींच्या वापरासाठी शेतकऱ्यांना उद्युक्त करणे लोकसहभागातून योजना राबविणे, रोगराईत वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना आरोग्याची आगाऊ सूचना देणारी यंत्रणा विकसित करणेसेंद्रीय शेतीसाठी शेतकºयांना प्रोत्साहित करणे, बाजारपेठ उपलब्ध करणे, सामूहिक शीतगृहे निर्माण करणे, प्रशिक्षण व बाजारपेठ निर्माण करणे, पाण्याच्या योग्य वापरासाठी कृती आराखडा तयार करणे, वाहनांच्या प्रदूषणासाठी कठोर मानके तयार करणे.वातावरणीय बदलानुसार संभाव्य तापमानवाढपर्यावरण विभागाने वातावरणीय बदलासाठी अतिसंवेदनशील जिल्ह्याची यादी तयार केली. यामध्ये अमरावती जिल्हाचा निर्देशांक १६ वा आहे. असुरक्षिततेमध्ये १३ व्या स्थानी, संवेदनशीलतेच्या ८ व्या स्थानी, तर अनुकूलतेच्या २० व्या स्थानी आहे. आयएमडीच्या अहवालानुसार जिल्ह्याचे वार्षिक किमान तापमान २७.२१ अंश सेल्सिअस आहे. यामध्ये सन २०३० पर्यंत १.४४ ते १.६४ डी.से. तसेच सन २०५० पर्यंत २.२ ते २.३५ डि.से. तर सन २०७० पर्यंत ३.०६ ते ३.४६ डि.से. प्रक्षेपित वाढ होऊ शकते.

टॅग्स :Temperatureतापमान