बडनेरा बसस्थानक आवारात घाणच घाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 05:01 IST2019-09-30T05:00:00+5:302019-09-30T05:01:25+5:30
बसस्थानकाहून मोठ्या संख्येत प्रवाशी बाहेरगावी प्रवास करीत असतात. जवळपासच्या खेड्यांमधील विद्यार्थी शिकण्यासाठी एसटी बसने येथे येतात. त्यामुळे बसस्थानकावर मोठी गर्दी असते. सद्या डेंग्यू, साथरोगाने चांगलेच तोंड वर काढले आहे. प्रवासी आजाराला घाबरून आहेत.

बडनेरा बसस्थानक आवारात घाणच घाण
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : राज्य परिवहन महामंडळाच्या येथील बसस्थानक परिसरात ठिकठिकाणी घाणच घाण साचली आहे. स्वच्छतेचा स्वतंत्र कंत्राट सोपविला असताना बस स्थानकावर घाणीचा विळखा कसा?, असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे.
येथील बसस्थानकाहून मोठ्या संख्येत प्रवाशी बाहेरगावी प्रवास करीत असतात. जवळपासच्या खेड्यांमधील विद्यार्थी शिकण्यासाठी एसटी बसने येथे येतात. त्यामुळे बसस्थानकावर मोठी गर्दी असते. सद्या डेंग्यू, साथरोगाने चांगलेच तोंड वर काढले आहे. प्रवासी आजाराला घाबरून आहेत. बसस्थानक परिसरातील घाणीने आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. बसस्थानकाच्या दर्शनी भागात घाणच घाण साचली आहे. परिसरातील हॉटेल चालक सर्रास सांडपाणी, त्यांच्याकडील केरकचरा आणून टाकतात. त्यापासून डासांचा मोठा प्रादूर्भाव झालेला आहे.
आगारात प्लास्टिकचा खच, प्रवासी त्रस्त
बसस्थानकाच्या आवारात मोठ्या प्रमाणात निकामी खाद्यपदार्थांचे पाकीटात रिकाम्या प्लास्टीक बाटल्सचे ढीग साचून आहेत. बसस्थानकाची स्वच्छता होत नसेल, तर साफसफाईचा कंत्राट केवळ देयके काढण्यासाठी दिला काय? असा सवाल प्रवाशी वर्गातून उपस्थित होत आहे.