शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
6
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
7
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
10
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
11
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
12
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
13
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
14
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
15
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
16
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
17
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
18
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
19
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
20
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात

मेळघाटात डिजिटल व्हिलेजचा फज्जा, आय सेंटर, पॉस मशीन बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 18:21 IST

धारणी/ हरिसाल : अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी यांनी बुधवारी देशातील पहिल्या डिजिटल व्हिलेज हरिसालचा अचानक दौरा केला.

श्यामकांत पाण्डेयधारणी/ हरिसाल : अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी यांनी बुधवारी देशातील पहिल्या डिजिटल व्हिलेज हरिसालचा अचानक दौरा केला. डिजिटल व्हिलेजमधील अनेक यंत्रणा योग्य रितीने कार्यरत नाहीत, याचे ते प्रत्यक्षदर्शी ठरले. लोकमतने देशातील पहिले डिजिटल व्हिलेजमधील समस्या व हरिसालमधून रोजगारासाठी स्थालांतर होत असल्याचे वृत्त १२ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केले. यानंतर अधिका-यांनी सारवासारव करण्यासाठी माहिती अधिका-यांच्या नेतृत्वात एका पथकाने भेट दिली होती.अतिरिक्त जिल्हाधिका-यांनी साध्या गाडीत आपल्या सहका-यांसमवेत हरिसालपर्यंतचा प्रवास केला. येथील प्रकल्पांची माहिती घेतली.हरिसालमधील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आॅनलाइन सेवा देणारे कंटेनर बंद होते. तसेच सीटीसी व आय सेंटर एकाच ठिकाणी असल्याचे पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. यासोबतच आय केअर सेंटरसाठी आणलेली मशीन धूळ खात असल्याने त्यांनी प्रभारी अधिका-यांना बोलावले. मात्र प्रभारी चिखलदरा येथे शासकीय कामासाठी गेल्याचे सांगण्यात आले. येथील डॉ. प्रियंका कंटाळे यांनी आय केअर सेंटरसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली. त्यांनी लगेच जिल्हा आरोग्य अधिका-यांना जागा उपलब्ध करून द्यावी अशा सूचना त्यांनी केल्या. जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन ई-लर्निंगची माहिती जाणून घेतली व समाधान व्यक्त केले.तपासणी झाली, औषधे मिळाली नाहीपरदेशी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला रुग्णांशी संवाद साधला. त्यांची तपासणी झाल्याचे सांगितले. मात्र ढाकणा येथील जमुना मनोज धांडे या महिलेने औषध मिळाले नाही, अशी तक्रार करताच अतिरिक्त जिल्हाधिकारी अवाक झाले. त्यांना महिलेस उत्तर देण्यासाठी शब्दच नव्हते. येथील नेट सेवा व्यवस्थित सुरू नसल्याने पॉस मशीनचा लाभ मिळत नाही. अनेक प्रयत्नानंतरही मशीन दुरुस्त झाली नाही. यामुळे आॅनलाइन व्यवहार करावे तरी कसे.- सईद खान,व्यावसायिक, हरिसालहरिसालमध्ये यंत्रणा सध्या प्राथमिक अवस्थेत आहे. यात सुधारणा करण्याची गरज आहे. संबंधित सर्व विभागांना माहिती देण्यात येईल.- खुशालसिंग परदेशी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, अमरावती

टॅग्स :Amravatiअमरावतीdigitalडिजिटल