जिल्हा परिषदेत बदली प्रक्रियेची धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:01 IST2020-07-21T05:00:00+5:302020-07-21T05:01:35+5:30

जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणार की नाही, अशी सांशकता व्यक्त केली जात होती. अशातच राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने वर्ग ३ व वर्ग ४ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या १५ टक्के मर्यादेत करण्यास हिरवी झेंडी दिली आहे. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासन विभागाने बदली प्रक्रियेची कार्यवाही सुरू केली होती.

Dhoom of transfer process in Zilla Parishad | जिल्हा परिषदेत बदली प्रक्रियेची धूम

जिल्हा परिषदेत बदली प्रक्रियेची धूम

ठळक मुद्देआजचा मूहूर्त; 'झूम अ‍ॅप'व्दारे समुपदेशन, सामान्य प्रशासन विभागाची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील विविध विभागांतील वर्ग ३ व वर्ग ४ मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया मंगळवार, २१ जुलैपासून राबविली जाणार आहे. बदलीचे समुपदेशन झूम अ‍ॅपव्दारे केले जाणार आहे. याकरिता सामान्य प्रशासन विभागाने आवश्यक कार्यवाही केलेली आहे.
जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणार की नाही, अशी सांशकता व्यक्त केली जात होती. अशातच राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने वर्ग ३ व वर्ग ४ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या १५ टक्के मर्यादेत करण्यास हिरवी झेंडी दिली आहे. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासन विभागाने बदली प्रक्रियेची कार्यवाही सुरू केली होती. त्यानुसार कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठतेनुसार यादी तयार केली आहे. सदर यादीवर प्राप्त सूचना, हरकतींच्या निराकरणानंतर १८ जुलै रोजी बदलीपात्र कर्मचाऱ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मंगळवार, २१ जुलैपासून प्रत्यक्ष बदली प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. बदली प्रक्रियेचे समुपदेशन 'झूम अ‍ॅप'व्दारे केले जाणार आहेत.
जिल्हा परषिदेच्या डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात बदलीची कार्यवाही झेडपी अध्यक्ष बबलू देशमुख, मुख्यकार्यकारी अधिकारी अमोल येडगे, डेप्युटी सीईओ तुकाराम टेकाळे व संबंधित विभागाच्या खातेप्रमुखांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

सात विभागांतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या आज
मंगळवारी सकाळी १० वाजतापासून झेडपीच्या डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात पशुसंवर्धन, सिंचन, ग्रामीण पाणीपुरवठा, बांधकाम, कृषी, वित्त आणि महिला व बालकल्याण विभाग अशा ७ विभागांतील कर्मचाºयांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. यामध्ये प्रशासकीयसाठी ३९, तर विनंतीसाठी ११९ विविध विभागांतून कर्मचाऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

Web Title: Dhoom of transfer process in Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.