अमरावतीत १९ वर्षीय तरूणाकडून देशी कट्टा जप्त

By प्रदीप भाकरे | Updated: December 9, 2023 12:59 IST2023-12-09T12:58:27+5:302023-12-09T12:59:07+5:30

शिवाजी नगर, सुतगिरणी परीसरातील खुल्या मैदानात एक इसम हा देशी बनावटीचा कटटा बाळगून उभा आहे.

Desi katta seized from 19-year-old youth in Amravati | अमरावतीत १९ वर्षीय तरूणाकडून देशी कट्टा जप्त

अमरावतीत १९ वर्षीय तरूणाकडून देशी कट्टा जप्त

अमरावती: स्थानिक सुतगिरणी परिसरातील शिवाजीनगरलगतच्या खुल्या मैदानातून देशी कट्टा बाळगणाऱ्या एका १९ वर्षीय तरूणाला अटक करण्यात आली. ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास राजापेठ पोलिसांनी ही कारवाई केली. अक्षय संजय चव्हाण (१९, रा. चवरे नगर, अमरावती) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो कटटा आपण परिचयातील अजय गणेश वानखडे (२२, रा. शिवाजी नगर, अमरावती) याचेकडून घेतल्याची कबुली त्याने दिली.             

शिवाजी नगर, सुतगिरणी परीसरातील खुल्या मैदानात एक इसम हा देशी बनावटीचा कटटा बाळगून उभा आहे, अशी माहिती राजापेठ पोलिसांना शुक्रवारी मिळाली. कारवाईदरम्यान त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे २० हजार रुपये किमतीचा देशीकट्टा आढळून आला. आरोपीने स्वत:ची ओळख अक्षय संजय चव्हाण अशी दिली. त्याच्याविरूध्द राजापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

यांनी केली कारवाई

पोलीस आयुक्त नविनचंद्र रेडडी, पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे, यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठच्या ठाणेदार सिमा दाताळकर, पोलीस निरिक्षक पुनित कुलट, उपनिरिक्षक गजानन काठेवाडे, पोहेकाॅं मनीष करपे, रवी लिखितकर, पंकज खटे, गणराज राउत, संजय वानखडे व सागर भजगवरे यांनी ही कारवाई केली.

Web Title: Desi katta seized from 19-year-old youth in Amravati