मुंबईतून अमरावतीत डिलिव्हरी; ड्रग पेडलरचे त्रिकूट जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 20:07 IST2025-04-09T20:06:13+5:302025-04-09T20:07:02+5:30

४० ग्रॅम एमडीसह ८.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त, स्पेशल स्कॉडची कारवाई

delivery from mumbai to amravati three drug peddlers arrested | मुंबईतून अमरावतीत डिलिव्हरी; ड्रग पेडलरचे त्रिकूट जेरबंद

मुंबईतून अमरावतीत डिलिव्हरी; ड्रग पेडलरचे त्रिकूट जेरबंद

अमरावती : मुंबईतून रस्ता मार्गाने एमडी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या तिघांना पोलीस आयुक्तांच्या स्पेशल स्कॉडने बडनेरा-अकोला मार्गावरून अटक केली. त्यांच्याकडून ४०.३४ ग्रॅम एमडी ड्रग्जसह कार, तीन मोबाइल व वजन काटा असा ८ लाख ३२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ९ एप्रिल रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.

अब्दुल एजाज अब्दुल अजीम (४७, रा. हबीबनगर, अमरावती), शाहरुख खान बिसमिल्ला खान (३०, रा. खुर्शीदपुरा, अमरावती) व अविनाश मनोज खांडेकर (२८, रा. जुनी वस्ती, बडनेरा) अशी अटक करण्यात आलेल्या ड्रग पेडलरची नावे आहेत. मुंबईहून एका कारमधून अमरावतीला विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज आणण्यात येत असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या पीाआय आसाराम चोरमले यांच्या स्पेशल स्कॉडला मिळाली. त्या आधारे स्कॉडने बडनेरा-अकोला मार्गावर सापळा रचून एमएच २७ बीझेड २०११ ही कार अडविली. त्यावेळी कारमध्ये अब्दुल एजाज, शाहरुख खान व अविनाश हे तिघे बसून होते. विशेष पथकाने कारची झडती घेतल्यावर त्यात ४०.३४ ग्रॅम एमडी ड्रग्ज आढळून आले. त्यानुसार पथकाने तिघांनाही अटक करून त्यांच्याकडून एमडी ड्रग्ज, कार, ३ मोबाइल व वजन काटा असा एकूण ८ लाख ३२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

बडनेरा पोलिसांत गुन्हा दाखल

आरोपींविरुद्ध बडनेरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई स्पेशल स्कॉडचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले, एटीसीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश इंगळे, पोलीस उपनिरीक्षक तुषार गावंडे, युसूफ सौदागर, छोटेलाल यादव, रणजित गावंडे, निखिल माहुरे, आशिष डवले, निवृत्ती काकड, संजय भारसाकडे, अमोल मनोहर, नईम बेग, गजानन सातंगे यांनी ही कारवाई केली.

Web Title: delivery from mumbai to amravati three drug peddlers arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.