शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Deepali Chavan Suicide Case: रेड्डीचा जामीन अर्ज फेटाळला; न्यायालयाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 04:55 IST

Deepali Chavan Suicide Case: वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येला कारणीभूत उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला पाठीशी घातल्याचा आरोप रेड्डी यांच्यावर आहे.

- नरेंद्र जावरेपरतवाडा (जि. अमरावती) : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे तत्कालीन तथा निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अचलपूर येथील तदर्थ व जिल्हा सत्र न्यायाधीश क्रमांक १ एस. ए. मुंगीनवार यांच्या न्यायालयाने शनिवारी दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर फेटाळला.वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येला कारणीभूत उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला पाठीशी घातल्याचा आरोप रेड्डी यांच्यावर आहे. शासनाने त्यांना निलंबित केले आहे. त्यामुळे त्यांच्यातर्फे वकील दीपक वाधवानी यांनी अचलपूर न्यायालयात अंतरिम अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने सरकारी पक्षाचे म्हणणे ऐकण्यासाठी ३ एप्रिल ही तारीख ठेवली होती. शनिवारी दोन्ही पक्षांनी आपले म्हणणे मांडले. त्यानंतर रेड्डी यांचा अर्ज फेटाळण्यात आला. सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी अभियोक्ता परीक्षित गणोरकर, सहायक सरकारी अभियोक्ता डी. ए. नवले व गोविंद विचोरे यांनी सरकारची बाजू मांडली. सदर प्रकरणाच्या तपास अधिकारी तथा एसडीपीओ पूनम पाटील यासुद्धा न्यायालयात हजर होत्या.अटकपूर्व जामीन किंवा सात दिवसांपूर्वी कळवा दीपाली चव्हाण प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यामुळे गुन्हा दाखल करून केव्हाही अटक करू शकतात. त्यामुळे एक तर अटकपूर्व जामीन द्या किंवा अटक करण्यापूर्वी सात दिवसांपूर्वी कळवा, अशी मागणी रेड्डी यांच्यातर्फे वकील दीपक वाधवानी यांनी न्यायालयात केली होती.न्यायालयाने सरकारी पक्षाचे म्हणणे ऐकण्यासाठी ३ एप्रिल ही तारीख ठेवली होती. गुन्हा दाखल नाही, तर संरक्षण कशाचे?रेड्डी यांच्याविरुद्ध गुन्हाच दाखल नाही. त्यामुळे संरक्षण कशाचे आणि काय द्यायचे, असा प्रश्न न्यायालयाने केला. पोलिसांना विकृत मानसिकतेने त्यांना अटक करायची असती तर तेव्हा त्यांना अटक केली असती. मात्र, गुन्हा दाखल होणार की नाही हेसुद्धा अजून स्पष्ट झालेले नाही. अशा परिस्थितीत संरक्षण का द्यायचे, असा युक्तिवाद सरकारी पक्षाच्यावतीने जिल्हा अभियोक्ता परीक्षित गणोरकर यांनी केला.

टॅग्स :Deepali chavanदीपाली चव्हाण