शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
2
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
3
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
4
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
5
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
6
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
7
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
8
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
9
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
10
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
11
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
12
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
13
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
14
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
15
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
16
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
17
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
18
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
19
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
20
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स

व-हाडात ४६ तालुक्यांतील भूजल पातळील घट; अकोला जिल्ह्यात भूजलस्तर १० फुटांपर्यंत कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2018 5:16 PM

पावसाळ्यात सरासरीपेक्षा २४ टक्क्यांनी कमी पाऊस व दिवसेंदिवस होत असलेला पाण्याचा प्रचंड उपसा, त्यातुलनेत न झालेले भूजल पुनर्भरण आदींमुळे विभागातील ४६ तालुक्यांतील भूजलस्तर १० फुटांपर्यंत कमी झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने ५६ तालुक्यांतील ६४७ निरीक्षण विहिरीतील पाण्याच्या पातळीची मोजमाप केल्यानंतर हा नित्कर्ष काढला. 

- गजानन मोहोड

अमरावती : पावसाळ्यात सरासरीपेक्षा २४ टक्क्यांनी कमी पाऊस व दिवसेंदिवस होत असलेला पाण्याचा प्रचंड उपसा, त्यातुलनेत न झालेले भूजल पुनर्भरण आदींमुळे विभागातील ४६ तालुक्यांतील भूजलस्तर १० फुटांपर्यंत कमी झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने ५६ तालुक्यांतील ६४७ निरीक्षण विहिरीतील पाण्याच्या पातळीची मोजमाप केल्यानंतर हा नित्कर्ष काढला. विभागात अकोला जिल्ह्यातील तीन तालुक्यांत १० फुटांपेक्षा भूजल पातळी खोल गेल्याने यंदाच्या उन्हाळ्यात पाण्यावी तीव्र टंचाई आहे. आठ तालुक्यांत दोन ते तीन मीटरपर्यंत खालावली आहे. यामध्ये अमरावती व अकोला तालुक्यात प्रत्येकी तीन तसेच वाशिम जिल्यातील दोन तालुक्यांचा समावेश आहे. एक ते दोन मीटरपर्यंत २३ तालुक्यांची पातळी खोल गेली. यामध्ये अमरावती जिल्यात पाच, अकोला जिल्यात एक,  वाशिम जिल्ह्यात चार, व यवतमाळ जिल्ह्यातील १३ तालुक्यांचा समावेश आहे. ० ते एक मीटरपर्यंत १२ तालुक्यांची पातळी खोल गेली यामध्ये अमरावती जिल्ह्यातील पाच, बुलडाणा जिल्ह्यातील चार, व यवतमाळ जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात एप्रिल ते जून २०१८ या कालावधीत १,३११ गावांमध्ये पाण्याची टंचाई जाणवणार असल्याने १,६४१ उपाययोजना सयुंक्त स्वाक्षरी अहवालात विभागीय आयुक्तांना सुचविण्यात आल्यात, या कामांवर ११ कोटी ५४ लाखांचा निधी खर्च होणार आहे.विभागात २०१७ मधील पावसाळ्यात सरासरी ७७७.९ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात ५८१.३ मिमी पाऊस पडला ही ७६ टक्केवारी आहे. पावसाच्या १२० दिवसांच्या तुलनेत फक्त ३६ दिवस पावसांचे राहिले. त्याचे  साईड इफेक्ट आता जाणवायला लागले आहेत. केवळ बुलडाणा जिल्ह्यात सरासरी इतका पाऊस झाल्याने या जिल्ह्यातील नऊ तालुक्यांच्या भूजल पातळीत ० ते दोनमीटरपर्यंत पाणीपातळीत वाढ झाल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाच्या वैज्ञानिक  केतकी जाधव यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

अचलपूर तालुक्यातील पातळी सर्वाधिक कमीविभागात सर्वाधिक अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात उणे ७.१८ मीटरपर्यंत, अंजनगाव सुर्जी उने ३.२१ पातळी कमी झालेली आहे. अकोला जिल्ह्यात तेल्हारा उणे ४.६४, बाळापूर उणे ३.९३, पातूर उणे ३.०४ मीटरपर्यंत पातळी खोल गेली आहे. या तालुक्यांमध्ये भूजल उपशावर निर्बंध ठेवणे आवश्यक आहे. नवीन विंधन विहीर खोदण्यास महाराष्ट्र भूजल (विकास आणि व्यवस्थापन) २००८ मधील ८(१) या तरतुदी अन्वये बंदी घालणे आवश्यक आहे.

विभागात यंदा पर्जन्यमान कमी झाले. त्यामुळे जमिनीचे पुनर्भरण झालेले नाही. त्यातुलनेत उपसा मात्र अधिक होत आहे. परिणामी विभागातील ४६ तालुक्यांतील भूजल पातळी शून्य ते तीन मीटरपर्यंत खाली आली आहे.- पी. व्ही. कठाणेउपसंचालक, जीएसडीए

टॅग्स :Amravatiअमरावती