टि्वटररून आमदार यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी

By उज्वल भालेकर | Updated: July 31, 2023 12:23 IST2023-07-31T12:22:12+5:302023-07-31T12:23:46+5:30

कैलास सुर्यवंशी टि्वटर हँडलवरून ही धमकी देण्यात आली आहे.

Death threat to MLA Yashomati Thakur on Twitter | टि्वटररून आमदार यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी

टि्वटररून आमदार यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी

अमरावती : संभाजी भिडे विरुद्ध आंदोलन करुन त्यांना अटक करण्याची मागणी करणाऱ्या कॉँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. कैलास सुर्यवंशी टि्वटर हँडलवरून ही धमकी देण्यात आली आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विरुद्ध शिवप्रतिष्ठान हींदूस्थानचे संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे या विरोधात कॉँग्रेसने राज्यभर आंदोलनकरुन भिडे गुरुजींना अटक करण्याची मागणी केली होती. आमदार यशोमती ठाकून यांनीही या संदर्भात शनिवारी राजकमल चौकात आंदोलन करुन भिंडेचा निषेध नोंदविला होता. त्यामुळे आता त्यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचे बोलल्या जात आहे. कैलास सुर्यवंशी टि्वटर हँडलवरून ही धमकी आली आहे. या टि्वट मध्ये दाभोळकर असाच ओरडत होता एक दिवस जन्नतमध्ये पाठवला, टरा टरा फाडून टाकला असे वादग्रस्त टि्वट करण्यात आले आहे.

Web Title: Death threat to MLA Yashomati Thakur on Twitter