शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

हॉकर्स सर्वेक्षणासाठी १० जानेवारी ‘डेडलाइन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 05:00 IST

ज्या फेरीवाल्यांचे सर्वेक्षण झाले आहे आणि कागदपत्रे जमा करणे बाकी आहे, अशा फेरीवाल्यांनी आपली सर्व कागदपत्रे ३१ डिसेंबरपर्यंत जमा करणे अनिवार्य आहे. हॉकर्स झोन व फेरीवाला सर्र्वेेेक्षणाबाबत आयुक्त संजय निपाणे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी घेण्यात आली. त्यामध्ये आयुक्तांनीे सदर निर्देश दिले.

ठळक मुद्देमहापालिका आयुक्तांची तंबी : १६३७ फेरीवाल्यांची कागदपत्रे जमा नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ज्या फेरीवाल्यांचे सर्वेक्षण झाले आहे आणि कागदपत्रे जमा करणे बाकी आहे, अशा फेरीवाल्यांनी आपली सर्व कागदपत्रे ३१ डिसेंबरपर्यंत जमा करणे अनिवार्य आहे. हॉकर्स झोन व फेरीवाला सर्र्वेेेक्षणाबाबत आयुक्त संजय निपाणे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी घेण्यात आली. त्यामध्ये आयुक्तांनीे सदर निर्देश दिले.ज्या पथविक्रेता/फेरीवाल्यांचे सर्वेक्षण झालेले नाही, त्यांनी राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कार्यालयात ३१ डिसेंबरपर्यंत पथविक्रेता नोंदणी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. या बैठकीत उपआयुक्त सुरेश पाटील, शहर प्रकल्प अधिकारी नरेंद्र वानखडे, सहायक संचालक नगर रचना आशिष उईके, शहर अभियंता रवींद्र पवार, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक, अतिक्रमण निर्मूलन पथकप्रमुख गणेश कुत्तरमारे, एन.यू.एल.एम. व्यवस्थापक भूषण बाळे, प्रफुल्ल ठाकरे, उदय चव्हाण, आनंद काशीकर, अमर सिरवानी तसेच फेरीवाला संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.३१ डिसेंबरपर्यंत नोंदणी, सर्वेक्षण किंवा कागदपत्रे जमा करणारे फेरीवाले यांचे सर्वेक्षण १० जानेवारीपर्यंत करण्यात येईल तसेच प्रारूप यादी १३ जानेवारीला सर्व झोननिहाय, मुख्य कार्यालयांच्या वेबसाइटवर व सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर कोणत्याही पथविक्रेता/फेरीवाला याची नोंदणी, सर्वेक्षण किंवा कागदपत्रे जमा करता येणार नाही, असे या बैठकीत ठरविण्यात आले.केंद्र शासनाच्या पथविक्रेता उपजीविका संरक्षण व विक्री विनिमय अधिनियम (१) ३६ मधील कलम २०१४ अनुसार राज्य शासनाने पथविक्रेता ३८ तसेच कलम २०१६ महाराष्ट्र नियम उपजीविका संरक्षण व विक्री विनिमय अनुसार पथविक्रेता योजना २०१७ मंजूर केलेली आहे. महानगरपालिका क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या परवानाधारक/विना परवाना फेरीवाला व्यावसायिकांनी त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाईल नंबर) स्वत:च्या आधार कार्ड$ क्रमांकाशी संलग्न (लिंक) करून घेणे आवश्यक आहे.मोबाइल अ‍ॅपद्वारेबायोमेट्रिक पद्धतीने सर्वेक्षणआधार कार्डाची प्रत, रेशन कार्ड प्रत, महाराष्ट्रातील अधिवास असल्याचे सक्षम प्राधिकरणाकडील अधिवास प्रमाणपत्र, दिव्यांग असल्यास त्याबाबतचे (अपंग) प्रमाणपत्र, विधवा एकल महिला असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र, परित्यक्ता/अनुसूचित जाती-जमाती या गटात समावेश असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र, बँक पासबूकची झेरॉक्स प्रत आदी कागदपत्राच्या प्रती मोबाइल अ‍ॅपद्वारे बायोमेट्रिक पद्धतीने सर्वेक्षण होत असताना जवळ तयार ठेवाव्यात, असे आवाहन अमरावती महानगरपालिकेच्यावतीने नागरिकांना करण्यात येत आहे.बसस्टॉपजवळ मनाईसमाजकल्याण विभागाकडून शहरात विविध ठिकाणी स्टॉल देण्यात आले आहेत. सदर स्टॉल ज्या ठिकाणी परवानगी दिली, त्या ठिकाणी नसल्यास जप्त करण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले. बस स्टॉपजवळ हॉकर राहणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. अनधिकृत प्लास्टिकचा वापर करणाºया हॉकरवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. दरमहा यासंदर्भात बैठक घेण्याचे सूचित करण्यात आले.ठाणे येथील संस्थेकडे सर्वेक्षणअमरावती महापालिका क्षेत्रात व्यवसाय करणाºया पथविक्रेता/फेरीवाल्यांचे मोबाइल अ‍ॅपद्वारे बायोमेट्रिक पद्धतीने सर्वेक्षण करण्याचे काम सेवादल नागरी सेवा सहकारी संस्था मर्यादित (ठाणे) या बाह्य संसाधन संस्थेकडून मे २०१९ पासून करण्यात येत आहे. शहरातील ३०३२ पथविक्रेता /फेरीवाला यांचे सर्वेक्षण झाले आहे. त्यापैकी १६३७ पथविक्रेता/ फेरीवाल्यांनी त्यांची अद्ययावत कागदपत्रे जमा केलेली नसल्याचे आयुक्तांनी सांगितले.

टॅग्स :Marketबाजार