शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

दर्यापूर तालुक्यात

By admin | Updated: May 21, 2016 00:21 IST

निसर्गाच्या कोपामुळे गतवर्षीच खरीप व रबी हंगाम हातून गेल्यामुळे हवालदिल झालेला बळीराजा आता नव्या उमेदीने येणाऱ्या खरीप हंगामासाठी सज्ज झाला आहे.

कपाशीचे पेरणी क्षेत्र वाढणारबळीराजा सज्ज : तुरीच्या लागवड क्षेत्रात होणार वाढशुभम बायस्कार दर्यापूरनिसर्गाच्या कोपामुळे गतवर्षीच खरीप व रबी हंगाम हातून गेल्यामुळे हवालदिल झालेला बळीराजा आता नव्या उमेदीने येणाऱ्या खरीप हंगामासाठी सज्ज झाला आहे.हवामान खात्याने यंदा चांगला पाऊस पडणार असल्याचे भाकित वर्तविल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सध्या मृग नक्षत्राचा चांगला पाऊस झाल्यानंतर पेरणीसाठी शेतीच्या मशागतीत ते व्यस्त आहेत.आगामी हंगामासाठी लागणारे बी-बियाणे व खते खरेदीसाठी पैशांची तजवीज करण्याचे बळीराजाचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. दर्यापूर तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ८० हजार ३८५ हेक्टर असून त्यापैकी ७५ हजार ७८ हेक्टर जमीन लागवडीयोग्य आहे. त्यातील ७२ हजार ८४४ हेक्टर क्षेत्रफळ लागवडीखाली असून यापैकी ७१ हजार ७६३ हेक्टर क्षेत्रफळावर खरीप पिकांची लागवड अपेक्षित आहे. तालुक्यात ओलिताखाली असणाऱ्या जमिनीचे क्षेत्रफळ ७०० हेक्टर आहेत.२०१६-१७ च्या खरीप हंगामात २० हजार पाचशे चार हेक्टर कपाशी ६११ हेक्टर व ज्वारी १२ हजार ७८० हेक्टर वर तूर १७ हजार ९३५ हेक्टरवर मूंग १५ हजार ९०१ हेक्टरवर सोयाबीन तर १ हजार ८०० हेक्टरवर इतर पिकांची पेरणी अपेक्षित आहे. यासाठी युरिया ३२०४ में टन डीएपी १६७४ मे.टन एम.ओ.पी.८०१ मे.टन तर मिश्र खते ३२८३ में टन एस.एस.पी २१७८ मेट्रिक टन साठा लागणार असल्याचा अंदाज आहे.तालुक्यासाठी यूरिया १३७०५ मे. टन डीएपी ४६० में टन एम.ओ.पी. ३६० मे. टन तर मिश्र खतांचा साठा २१८० मे. टन एसएसपी १४६० मे. टन इत्यादी प्रकारचा साठा तालुक्यासाठी मंजूर झाला आहे व लवकरच तो उपलब्ध होणार आहे.गतवर्षीच्या तुलनेत सोयाबीन व मुंग क्षेत्राच्या पेरनित घट होईल तर आणि उडित पेरणी क्षेत्रात वाढ होण्याचे संकेत आहेत. हंगामात भरपूर पाऊस पडून चांगले उत्पन्न निघावे यासाठी शेतकरी आत्तापासूनच निसर्गे देवतेला साकडे घालायला सुरुवात केलेली आहे.