अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात सिलेंडरचा स्फोट; ८ बालक जखमी
By गणेश वासनिक | Updated: September 25, 2022 13:03 IST2022-09-25T11:58:25+5:302022-09-25T13:03:15+5:30
घटनास्थळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात सिलेंडरचा स्फोट; ८ बालक जखमी
अमरावती : येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात रविवारी सकाळी ११ वाजता सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटाच्या धुरामुळे आठ नवजात बालकांना इजा पोहोचली असून त्यांना येथील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात स्थलांतरीत करण्यात आले आहे.
एकूण ३५ नवजात बालके वॉर्डात होते. सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर जिल्हा स्री रुग्णालयात एकच तारांबळ उडाली. काही क्षणातच रुग्णालय परिसरात अंबुलन्स पोहोचल्या. धावपळीमुळे प्रशासन हादरून गेले. आठ नवजात बालकांना स्थलांतरित करण्यात आले. दरम्यान अमरावती दौऱ्यावर असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी डफरीन रुग्णालयात भेट देऊन नवजात बालकांच्या कुटुंबाची आस्थेने विचारपूस केली आणि प्रशासनाला आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत. यावेळी माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना केल्यात.