भाजपाच्याच कार्यक्रमात अस्वच्छतेचा कळस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 01:21 IST2019-02-24T01:21:16+5:302019-02-24T01:21:42+5:30
येथील नगरपरिषद कन्या शाळेच्या प्रांगणात शनिवारी तालुका व शहर भाजप कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. मात्र, यात कमालीची अस्वच्छता दिसून आली. पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानास त्यांच्याच कार्यकर्त्यांनी हरताळ फासल्याची प्रतिक्रिया कार्यक्रमस्थळी उमटली.

भाजपाच्याच कार्यक्रमात अस्वच्छतेचा कळस
लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : येथील नगरपरिषद कन्या शाळेच्या प्रांगणात शनिवारी तालुका व शहर भाजप कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. मात्र, यात कमालीची अस्वच्छता दिसून आली. पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानास त्यांच्याच कार्यकर्त्यांनी हरताळ फासल्याची प्रतिक्रिया कार्यक्रमस्थळी उमटली. प्रतिबंधित प्लास्टिक ग्लासचा बिनदिक्कतपणे वापरण्यात आले.
आमदार रमेश बुंदिले यांच्या उपस्थितीत शनिवारी तालुक्यातील भाजप बुथप्रमुख व कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. तथापि, कार्यक्रमस्थळी प्रचंड बेशिस्त दिसून आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छतेसाठी कमालीचे आग्रही आहेत. मात्र त्यांच्याच भाजपच्या कार्यक्रमात बुंदिले यांच्या विकासकामाची पत्रके अस्ताव्यस्त टाकली गेली. जेवण स्थळी तर प्रतिबंधित प्लास्टिक पन्नीचा खच दिसून आला. पाणी पिण्यासाठी वापरलेले प्लास्टिकचे ग्लास तथा प्रतिबंधित थर्माकॉलच्या प्लेट्स अस्ताव्यस्त फेकल्या. प्लास्टिकचे द्रोण प्रांगणात फेकण्यात आले. पालिका प्रशासनास कुणालाही प्रतिबंधित प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाईचे धाडस झाले नाही. प्रशासानाच्या नाकावर टिच्चून कचरा इतस्तत: फेकल्याची चर्चा आहे.