शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
3
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
4
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
5
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
6
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
7
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
8
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
9
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
10
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
11
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
12
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
13
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
14
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट
15
दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत उद्या बँका बंद राहणार का, पाहा काय म्हटलंय RBI नं?
16
'युक्रेनमधील शांततेसाठी भारतावर कर लावणे आवश्यक', ट्रम्प प्रशासनाचा न्यायालयात युक्तिवाद
17
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
18
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
19
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
20
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...

पीक विमा भरपाईत कंपनीचेच चांगभलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 05:00 IST

प्रधानमंत्री पीक विमा योजना सन २०१६ च्या खरीप हंगामापासून राबविण्यात येत आहे. यापूर्वीच्या योजनांमध्ये शेतकऱ्यांना भरपाई कमी मिळून फसगत व्हायची म्हणून ही योजना राज्यात राबविण्यात येत आहे. प्रत्यक्षात या योजनेतही शेतकऱ्यांची तीच गत झालेली आहे. मागच्या खरीप हंगामात जिल्ह्यात १,८५,६०१ शेतकऱ्यांनी १,७३,०९८ हेक्टर क्षेत्राचा पीक विमा काढला होता. यासाठी १५,६६,२४,२३२ रुपयांचा हप्ता कंपनीकडे केला.

ठळक मुद्देदुष्काळस्थितीत १०९.४१ कोटींचा प्रीमियम कंपनीकडे भरणा, भरपाई मात्र, ६२.६३ कोटींची

गजानन मोहोडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्याची पैसेवारी ४७ असल्याने सर्व तालुक्यांत दुष्काळस्थिती असताना विमा कंपनीच्या लेखी मात्र, ऑलवेल आहे. खरीप २०२० च्या हंगामात कंपनीकडे १,८५,६०१ शेतकऱ्यांचा १०९ कोटी ४१ लाख ९७ हजार ८२२ रुपयांचा प्रीमियमचा भरणा करण्यात आला होता. पिकांच्या प्रतिकुल परिस्थितीतही विमा कंपनीद्वारा फक्त ४९,९३७ शेतकऱ्यांना ६२ कोटी ६३ लाख ३२ हजार १२ रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. ही शुद्ध फसवणूक असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.  प्रधानमंत्री पीक विमा योजना सन २०१६ च्या खरीप हंगामापासून राबविण्यात येत आहे. यापूर्वीच्या योजनांमध्ये शेतकऱ्यांना भरपाई कमी मिळून फसगत व्हायची म्हणून ही योजना राज्यात राबविण्यात येत आहे. प्रत्यक्षात या योजनेतही शेतकऱ्यांची तीच गत झालेली आहे. मागच्या खरीप हंगामात जिल्ह्यात १,८५,६०१ शेतकऱ्यांनी १,७३,०९८ हेक्टर क्षेत्राचा पीक विमा काढला होता. यासाठी १५,६६,२४,२३२ रुपयांचा हप्ता कंपनीकडे केला. याशिवाय राज्य व केंद्र शासनाचे प्रत्येकी ४६,८७,८६,७९५ असे एकूण १०९,४१,९७,८२२ रुपयांचा प्रिमियम कंपनीकडे जमा करण्यात आलेला आहे. कंपनीद्वारा मात्र, ४९,९३७ शेतकऱ्यांना ६२,६३,३२,०१२ रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. मागील हंगामात सुरुवातीला पाऊस नसल्यामुळे मूग, उडीद सारखी अल्पावधीतील पिके बाद झाली होती. त्यानंतर ऑगस्टपासून पावसाने रिपरीप लावली ती नोव्हेंबरपर्यंत सुरू होती. या परतीच्या पावसामुळे सोयाबीनचे पीक जाग्यावरच सडले. याशिवाय गंजीदेखील पावसाने खराब झाल्या. संपूर्ण सोयाबीनचे पीक उद्ध्वद्वस्त झाले. याशिवाय सततच्या पावसामुळे कपाशीच्या बोंडाला बुरशीजन्य रोगामुळे बोंडसड झाली. गुलाबी बोंडअळीनेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरिपाचे सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने जिल्हा प्रशासनाद्वारा ४७ पैसेवारी जाहीर करण्यात आली. या नुकसानाकरिता शासनाद्वारा ३,१४,८७० हेक्टर पिकासाठी ३३७.०६ कोटींची भरपाई देण्यात आली. कंपनीद्वारा मात्र, या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या हातावर तुरी देण्यात आल्याचा आरोप होत आहे.

अशी आहे तालुकानिहाय भरपाईअचलपूर तालुक्यात ७५,७८,३२५ रुपये, अमरावती १,५६,९७,४७२ रुपये, अंजनगाव सुर्जी ४ १४,००,२८९ रुपये, भातकुली २,०३,९७,१४२ रुपये, चांदूर रेल्वे २,३६,७८,१८१ रुपये, चांदूरबाजार २,१९,१०,२०९ रुपये, चिखलदरा ३६,८९,७७८, दर्यापूर ३२,९८,८६,८५१ रुपये, धामणगाव १ ९०,३१,७६१ रुपये, धारणी  १,०४,६४,८४६ रुपये, मोर्शी ७ २२,४३,९६३ रुपये, नांदगाव १,२७,९४,४९८ रुपये, तिवसा ३,८२,४६,९३३ रुपये व वरूड तालुक्यात ९३,११,७९४ रुपयांची भरपाई देण्यात आलेली आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांना ३.१८ कोटीपरतीच्या पावसामुळे पिकांचे जे नुकसान झाले त्याकरिता ३,५९८ शेतकऱ्यांना ३,१८,९९,०३१ रुपयांची भरपाई देण्यात आालेली आहे. यात कपाशीसाठी फक्त ३३८ शेतकऱ्यांना २५,०७,२५५ रुपये, सोयाबीनसाठी २,५२६ शेतकऱ्यांना२,६८,७५,६०९ रुपयांची भरपाई देण्यात आलेली आहे. याशिवाय उडदाला ३,८९,९८० व मुंगासाठी १२,४२,३३३ रुपयांची भरपाई दिलेली आहे.

काढणीपश्चात नुकसान, ७०२ शेतकऱ्यांना भरपाईपिकाच्या संवगणीनंतर परतीच्या पावसाने सर्वाधिक सोयाबीनचे नुकसान झालेले आहे. यात ६९४ शेतकऱ्यांना १,१४,३६,२७५ रुपयांची भरपाई विमा कंपनीद्वारा देण्यात आलेली आहे. याशिवाय कपाशीसाठी सहा शेतकऱ्यांना ३३,२५३, धानासाठी एका शेतकऱ्याला ९,१५१ रुपये याशिवाय तुरीसाठी एका शेतकऱ्याला ६,६४० रुपयांची भरपाई देण्यात आलेली आहे.

पीक विम्यात बीड पॅटर्न कोठे?पीक विम्याच्या भरपाईत शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी केंद्र शासनाकडे बीड जिल्ह्याचा पॅटर्न राबविण्याची विनंती केल्याचे कृत्रिमंत्री दादाजी भुसे यांनी मागील आठवड्यात जिल्हा दौऱ्यावर असताना सांगितले होते. यात १० प्रशासकीय खर्च व १० टक्के नफा घेऊन कंपनीद्वारा ८० टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, प्रत्यक्षात मात्र, असे काहीही झालेले नाही.

 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाagricultureशेती