शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
3
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
4
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
5
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
6
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
7
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
8
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
9
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
10
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
11
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
12
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
13
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
14
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
15
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
16
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
17
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
18
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
19
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
20
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात १६ लाख कर्मचाऱ्यांच्या वेतनावर संकट; दिवाळी कशी होणार साजरी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 15:38 IST

Amravati : महाराष्ट्र कोषागार नियम १९६८ नुसार जुलै २०२५ पासून राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतनासंदर्भात कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक तपशील एकत्रित स्वरूपाचा करण्यासाठी सेवार्थ प्रणाली सुरू करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य शासनाच्या ३९ विभागांमध्ये कार्यरत १६ लाख कर्मचाऱ्यांना अद्यापही सप्टेंबर महिन्याचा पगार मिळालेला नाही. अर्थ विभागाच्या सेवार्थ प्रणालीवर कर्मचाऱ्यांची माहिती अपडेट झाल्याशिवाय वेतन निघणार नाही, हे वास्तव आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांना पगाराविना राहण्याची वेळ आली आहे.

महाराष्ट्र कोषागार नियम १९६८ नुसार जुलै २०२५ पासून राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतनासंदर्भात कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक तपशील एकत्रित स्वरूपाचा करण्यासाठी सेवार्थ प्रणाली सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन देयके सेवार्थ प्रणालीद्वारे अदा होत असताना ऐन दिवाळीच्या पुढे सेवार्थ प्रणाली अपडेट करण्याची गरज वित्त विभागाला का पडली?, असा सवाल उपस्थित होत आहे.

कोषागार कार्यालयाचा नकार

राज्य शासनात ३९ शासकीय विभाग आणि २८ च्यावर महामंडळे कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन कोषागार कार्यालयातून मंजूर केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या बैंक खात्यामध्ये थेट जमा केले जाते. मात्र, पदांचा ताळमेळ न झाल्यामुळे कोषागार कार्यालयाने माहे सप्टेंबर महिन्याचे वेतन बिल संबंधित विभागांना परत केले नाही. १ तारखेला पगार देण्याचा शासन निर्णय असताना ७ ऑक्टोबरपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही.

कर्मचाऱ्यांचा ताळमेळ नाही

  • कर्मचाऱ्यांच्या सेवा ऑनलाइन झाल्यामुळे राज्यात नेमके शासकीय कर्मचारी किती? या संख्येबाबत प्रशासन विभागात मेळ जुळत नाही.
  • जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेत, असे कर्मचारी सेवा प्रणालीवर कार्यरत दिसतात. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना सेवार्थ प्रणालीमधून बाहेर न काढल्यामुळे हा गोंधळ झाला आहे.
  • आकृतिबंध याचासुद्धा ताळमेळ जुळत नाही. जोपर्यंत विभागाचे ३ प्रमुख अधिनस्थ कर्मचाऱ्यांची माहिती ऑनलाइन सेवार्थ प्रणालीवर ऑनलाइन करणार नाही, तोपर्यंत अशा विभागाचे वेतन होणार नसल्याचे समजते.

 

"राज्य शासनाच्या ऑगस्ट २०२५च्या एका आदेशानुसार शासन स्तरावर अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पदांचा ताळमेळ जुळत नाही. त्यामुळे विभाग प्रमुखांनी पदांचा ताळमेळ जुळवून तसे प्रमाणपत्र सादर करावे, असे निर्देश दिले होते. मात्र, बहुतांश विभागाने सप्टेंबर पेड ऑगस्ट महिन्यात प्रमाणपत्र सादर केले नाही. परिणामी, वेतन अदा करणे थांबले आहे."- अमोल ईखे, उपजिल्हा कोषागार अधिकारी, अमरावती

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Employees' Salary Crisis Looms Before Diwali Celebration

Web Summary : 1.6 million Maharashtra government employees face delayed September salaries due to Sevarth system updates. Discrepancies in employee data and departmental coordination have halted payments, casting a shadow over Diwali festivities. Treasury office cites mismatched data as the reason for the delay.
टॅग्स :AmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्रEmployeeकर्मचारीGovernmentसरकार