शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

क्राईमचा आलेख १९३ ने घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 5:00 AM

यंदा जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांत ३ हजार ३८ गुन्हे घडले आहेत. या आकडेवारीवरून २०१८ च्या तुलनेत यंदा १९३ गुन्हे कमी घडले आहेत. पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने केलेले नियोजनबद्ध कामकाज गुन्ह्यात कमी झाल्याची पावतीच आहे.

ठळक मुद्देसीपींच्या नियोजनबद्ध कामकाजाचे यश : कायदा व सुव्यस्थेला गालबोट नाही

वैभव बाबरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दरवर्षी गुन्हेगारीचा वाढता आलेख यंदा कमी झाल्याचे दिसून येत आहे. नोव्हेंबर २०१८ अखेर शहरात ३ हजार २३१ गुन्हे घडले होते. मात्र, यंदा जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांत ३ हजार ३८ गुन्हे घडले आहेत. या आकडेवारीवरून २०१८ च्या तुलनेत यंदा १९३ गुन्हे कमी घडले आहेत. पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने केलेले नियोजनबद्ध कामकाज गुन्ह्यात कमी झाल्याची पावतीच आहे.सन २०१९ या वर्षात लोकसभा व विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी होती. सण-उत्सवासह इज्तेमा असा भव्य सोहळा पार पडला. मात्र, कुठेही कोणत्याही प्रकारची मोठी किंवा अप्रिय घडली नाही. याचे सर्व श्रेय पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्या नियोजनबद्ध व शिस्तबद्ध कामकाजाला जाते. पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी ४ आॅगस्ट २०१८ रोजी पदभार सांभाळला, तेव्हापासून आतापर्यंतच्या १६ महिन्यांत कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागले नाही. अमरावती शहरातील लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सीपींनी पूर्व नियोजन करून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या होत्या. कुख्यात नऊ गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीएसारखा कठोर कारवाईचा बडगा उगारला. २२८ गुन्हेगारांना तडीपार केले. प्रतिबंधात्मक कारवाईचा सपाटा सुरूच ठेवला होता. त्यामुळे गुन्हेगारीला तोंड वर काढायला जागाच उरली नव्हती. निवडणूक, सण-उत्सव, आंदोलने, दरम्यानच जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० लागू, अयोध्या येथील मंदिराचा मुद्दा, नागरिकत्व विधेयकाचा निर्णय, या सर्व संवेदनशील मुद्यांवरून कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचण्याची दाट शक्यता होती. हजारो व लाखोंच्या संख्येने नागरिकांची गर्दी, गोंधळ होण्याची स्थिती सीपींनी नियोजनबद्ध बंदोबस्त लावून हाताळली. त्यातच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द केल्या होत्या. त्यांच्या शिस्तप्रिय व नियोजनबद्ध धोरणामुळे अधिनस्थ यंत्रणेचेही त्यांना मोलाचे सहकार्य लाभले. २०१९ सर्वाधिक आव्हाने पेलण्याचे वर्ष पोलिसांसाठी ठरले आहे. तरीसुद्धा पोलीस विभागाने अमरावतीकरांना सुरक्षित वातावरणात ठेवले. घडले ते केवळ वैयक्तिक स्वरुपाचे गुन्हे. सार्वजनिक ठिकाणी कुठल्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू न देण्यात पोलीस विभागाने मोलाची कामगिरी बजावली.सन २०१८ च्या तुलनेत यंदा गुन्हेगारीचा आलेख घटला आहे. निवडणुका, देशपातळीवर मोठे निर्णय, भव्य कार्यक्रम, सण-उत्सव पार पडले. मात्र, कुठेही कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहचली नाही. यात अमरावती पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली. हे त्यांचे श्रेय आहे.- संजयकुमार बाविस्कर, पोलीस आयुक्त, अमरावतीगुन्ह्यांचा लेखाजोखाशहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील दहा पोलीस ठाण्यांत या वर्षात २५ हत्येच्या घटना घडल्यात. ५८ खुनाचे प्रयत्न झाले. सदोष मनुष्यवधाचे ३ गुन्हे, ७६ बलात्कार, ५ दरोडे, १ दरोड्याचा प्रयत्न, ५८ जबरी चोरी, ६ चेनस्नॅचिंग, १५९ घरफोड्या, ७९६ चोºया, ४६ मोबाईल चोरीचे गुन्हे, ३७ दंग्याचे गुन्हे, १९ विश्वासघाताचे गुन्हे, ११० अपहरणाचे, ५९४ दुखापतीचे, ३४ सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या घटना, २७३ विनयभंग, १२ आत्महत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे, विवाहिता छळाचे ९४ गुन्हे, जनावरे चोरीचे २१ गुन्हे, ३३७ दुचाकी चोरीचे गुन्हे घडले आहेत.

टॅग्स :Policeपोलिस