शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
3
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
4
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
5
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
6
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
7
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
8
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
9
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
10
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
11
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
12
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
13
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
14
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
15
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
16
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
17
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
18
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
19
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
20
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण

दोन तालुक्यांच्या निर्मितीवर अचलपूर जिल्ह्याची मदार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 22:26 IST

अचलपूर जिल्ह्याच्या मागणीला ३८ वर्षे पूर्ण झालीत. १९८० पासून आजही ही मागणी प्रलंबित आहे. तथापि, चांदूरबाजार तालुक्याचे विभाजन करून आसेगाव पूर्णा आणि चिखलदरा तालुक्याचे विभाजन करून चुरणी तालुका झाल्याशिवाय अचलपूर जिल्हा होणे नाही.

ठळक मुद्देमागणीला ३८ वर्षे पूर्ण : राजकीय पाठपुराव्याची निकड, आजी-माजी लोकप्रतिनिधींकडून राज्य शासनाशी पत्रव्यवहार

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर जिल्ह्याच्या मागणीला ३८ वर्षे पूर्ण झालीत. १९८० पासून आजही ही मागणी प्रलंबित आहे. तथापि, चांदूरबाजार तालुक्याचे विभाजन करून आसेगाव पूर्णा आणि चिखलदरा तालुक्याचे विभाजन करून चुरणी तालुका झाल्याशिवाय अचलपूर जिल्हा होणे नाही.अचलपूर जिल्हानिर्मितीसाठी प्रशासकीय स्तरावरून सन २०१५ मध्ये शासनाकडे जो प्रस्ताव सादर करण्यात आला, त्यात अचलपूर, चांदूरबाजार, अंजनगाव, चिखलदरा, धारणी या पाच तालुक्यांसह आसेगाव पूर्णा आणि चुरणी या प्रस्तावित तालुक्यांचा संभाव्य अचलपूर जिल्ह्यात समावेश आहे. खरे तर अचलपूर जिल्हा व्हावा, ही मागणी १९८० ची आहे. माजी मंत्री वसुधा देशमुख, हरिशंकर अग्रवाल आणि काँग्रेसच्या अन्य मंडळीने त्यावेळी या मागणीच्या अनुषंगाने शासनाकडे निवेदन दिले. याच दरम्यान नागरिक व लोकप्रतिनिधींची सर्वपक्षीय नागरिक कृती समितीही गठित करण्यात आली होती. तत्कालीन एसडीओ खान यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार असताना तत्कालीन विधान परिषद सदस्य वसुधा देशमुख सदनातच उपोषणाला बसल्या होत्या. १५ डिसेंबर १९९८ ला तारांकित प्रश्न ३०,५४० ला अनुसरून आ. बी.टी. देशमुख यांनी सभागृहाचे लक्ष वेधले होते. तीन टर्मपासून अपक्ष म्हणून आ. बच्चू कडू विधानसभेत अचलपूरचे प्रतिनिधित्व करतात. मात्र, त्यांच्या पाठपुराव्यासही यश आलेली नाही. अचलपूर जिल्ह्याकरिता विद्यमान आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहार युवाशक्तीने ऐन दिवाळीच्या दिवशी ७ नोव्हेंबर १९९९ ला अचलपूर एसडीओ कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. यानंतर ८ नोव्हेंबरपासून तब्बल ४२ दिवस साखळी उपोषण केले. १५५ गावातील युवकांनी यात सहभाग दिला. सात हजार लोकांनी उपोषण मंडपास भेटी दिल्या होत्या. पुढे आमदार बच्चू कडू यांनी अचलपूर जिल्ह्यासह १९ मागण्यांकरिता २२ सप्टेंबर २००८ रोजी नागरवाडीत अन्नत्याग आंदोलन केले होते. २००५ पूर्वी मे १९९९ मध्ये तत्कालीन एसडीओ नितीन पाटील यांनीही शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता.मुघलकाळात अचलपूर होती राजधानीमुघल काळात अचलपूर हे राजधानीचे शहर होते. त्यावेळी एलिचपूर असे या शहराचे नाव होते. सीपी अँड बेरार प्रांत अस्तित्वात असतानादेखील अचलपूर जिल्हा होता. अचलपूर शहराला ऐतिहासिक, प्राचीन वारसा आहे. अचलपूर जिल्हा झाल्यास मेळघाटचे कुषोपण, बाल-माता मृत्यूवर नियंत्रण मिळविणे सुकर होईल. विदभार्तील काही मोजक्याच ‘अ’ वर्ग नगरपालिकांपैकी अचलपूर एक आहे. प्रशासकीय आणि तांत्रिकदृष्ट्या जिल्हा निर्मितीसाठी सर्वच सुविधा अचलपूरला प्राप्त आहेत. केवळ जिल्हा निर्मितीची शासनाकडून घोषणा होणे बाकी आहे.शासनकर्ते बदलताच विषय पडतो मागेविकासात्मकदृष्ट्या मागासलेपण आणि पायाभूत सुविधांचा अभाव अशा कारणांचा अंतर्भाव अचलपूर जिल्हा निर्मितीमागे होत असतो. मात्र, शासनकर्ते बदलताच अचलपूर जिल्हानिर्मितीचा विषय मागे पडल्याचे चित्र आहे. अचलपूर जिल्हानिर्मितीच्या प्रस्तावात चांदूरबाजार, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, धारणी, चिखलदरा या तालुक्यांचा समावेश आहेच तसेच चुर्णी व आसेगाव या दोन तालुक्यांचादेखील प्रस्ताव राहणार आहे. जिल्हा निर्मितीच्या अनुषंगाने अचलपुरात प्रशासकीय इमारतींसह आरोग्य, शिक्षण, सार्वत्रिक सुविधा अगोदरच उपलब्ध आहेत. परंतु, प्रशासकीय बोजा वाढण्याच्या भीतीने राज्य शासन या विषयाला बगल देत असल्याची विश्वसनीय माहिती आहे.अमरावती जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे. अमरावतीचे विभाजन करून अचलपूर जिल्हा निर्मिती करणे लोकहित व विकासाच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. आमदार होण्यापूर्वीपासून मी याकरिता प्रयत्नशील आहे. आमदार असताना विधानभवनात मी याकरिता उपोषणास बसले होते. यादरम्यान सभापतींनी सभागृहात अचलपूर जिल्हा निर्मितीबाबत आश्वस्त केले होते. यानंतर दोन नवीन जिल्हे निर्माण केले गेलेत. मात्र, अचलपूरकडे दुर्लक्ष केले गेले. अचलपूर जिल्हा व्हावा, हीच अपेक्षा.- वसुधाताई देशमुख, माजी राज्यमंत्री तथा माजी आमदार, अचलपूर.राज्यात जेव्हा नवीन जिल्हे निर्मित केले जातील तेव्हा अचलपूर जिल्हा अग्रक्रमाने केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी चर्चेदरम्यान स्पष्ट केले आहे. त्याआधी आसेगाव पूर्णा आणि चुरणी तालुके केल्या जातील. अचलपूर जिल्हा व्हावा याकरिता शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे.- बच्चू कडूआमदार, अचलपूर.अचलपूर जिल्हा निर्मितीबाबतचा सविस्तर प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. अपेक्षित खर्चही प्रस्तावात नमूद आहे. सध्या अचलपूर जिल्हा निर्मितीच्या अनुषंगाने शासनाकडून कुठलीही विचारणा नाही. प्रस्तावाव्यतिरिक्त कुठलीही माहिती नाही.- डॉ. व्यंकट राठोडउपविभागीय अधिकारी