रात्रीतून बेसुमार रेती तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 05:00 IST2020-01-07T05:00:00+5:302020-01-07T05:00:17+5:30
रेती तस्करीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. महसूल विभागाने अनेक वेळा कारवाया करूनही रात्रीतूनच तालुक्यात रेतीचा शिरकाव होतो तरी कसा, हा प्रश्न चर्चचा विषय आहे. अधिकारी आमचेच आहेत, असा रेती वाहतूकदारांचा दावा असतो. अशा वेळी जनतेचा वाली कोण, हा प्रश्न आहे. वरूड तालुक्यात प्रत्येक सुटीच्या दिवशी अधिकारी आणि रेती तस्करांमध्ये लपंडाव सुरू असतो.

रात्रीतून बेसुमार रेती तस्करी
लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : मध्य प्रदेशातून रेतीची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. गौण खनिजाची वाहतूक सूर्यास्तानंतर करणे कायद्याने गुन्हा असताना नियमांना बगल दिली जात आहे. पुसला मार्गे येणारे ओव्हरलोड रेतीचे टिप्पर पंढरीनजीक आरटीओ तपासणी नाका पार करीत असताना अधिकाऱ्यांची डोळेझाक कशासाठी, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
रेती तस्करीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. महसूल विभागाने अनेक वेळा कारवाया करूनही रात्रीतूनच तालुक्यात रेतीचा शिरकाव होतो तरी कसा, हा प्रश्न चर्चचा विषय आहे. अधिकारी आमचेच आहेत, असा रेती वाहतूकदारांचा दावा असतो. अशा वेळी जनतेचा वाली कोण, हा प्रश्न आहे. वरूड तालुक्यात प्रत्येक सुटीच्या दिवशी अधिकारी आणि रेती तस्करांमध्ये लपंडाव सुरू असतो.
तालुक्यात रेतीघाटांचा अद्यापही लिलाव झाला नसल्याने अधिकृत उपसा बंद आहे. तरीसुद्धा नदी-नाल्यांतून रात्रीतून रेतीची वाहतूक होत असून, याकरतीा रेती माफियांचे जाळेसर्वत्र तैनात असल्याची चर्चा आहे. मुरुम, खडीदेखील चोरट्या मार्गाने आणली जात आहे.
मध्य प्रदेशातून येणाºया रेतीची मोवाड, जलालखेडा, पुसला, सावंगी वाठोडा, उदापूर, राजुराबाजार येथे वाहतूक करण्यात येते. रात्रीतून कोणत्याही गौण खनिजाची वाहतूक करणे गुन्हा ठरत असतानाही मध्यप्रदेशातून वरूड तालुक्यात वाहतूक सुरु असते. याच रस्त्यावर परिवहन विभागाचा तपासणी नाका असल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वरूड शहरातील रेती विक्रेत्यांकडून ३० ते ४० टन वजनाचा ट्रक आणला जातो. शहराबाहेर रेतीचे ढीग लावून ट्रॅक्टरद्वारे चिल्लर विक्री व वाहतूक केली जाते. या रेती विक्रेत्यांना प्रशासनाचे अभय असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
महसूल बुडाला
४रेतीची वाहतूक करताना रॉयल्टी घेऊनच रेती वाहतूक करता येते. खदान ते नियोजित स्थळी रेती वाहतूक करण्याचा नियम असताना, रेतीचे ढीग लावून त्याची विल्हेवाट लावणे गुन्हा असताना, अशाच प्रकारे सर्रास रेती विकली जाते. यामुळे महसूल विभागाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. रेतीची चोरट्या मार्गाने वाहतूक होत असताना प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी अनभिज्ञ का, असा सवाल ग्रामीण भागातील नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. महसूल अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने रेती तस्करांचे चांगलेच फावले आहे.