शेतीशाळांच्या किट खरेदीत १.२० कोटीचा भ्रष्टाचार : आ. सुरेश धस यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 12:49 IST2025-06-19T12:48:20+5:302025-06-19T12:49:06+5:30

Amravati : कृषी आयुक्तांकडे तक्रार, जेडीए लहाळे अडचणीत

Corruption of Rs 1.20 crore in purchase of kits for agricultural schools: MLA Suresh Dhas's allegations | शेतीशाळांच्या किट खरेदीत १.२० कोटीचा भ्रष्टाचार : आ. सुरेश धस यांचा आरोप

Corruption of Rs 1.20 crore in purchase of kits for agricultural schools: MLA Suresh Dhas's allegations

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
कृषी विभागातील काही चर्चित अधिकाऱ्यांविरोधात आ. सुरेश धस चांगलेच आक्रमक झाले आहेत. यामध्ये अमरावतीचे विभागीय कृषी सहसंचालक (जेडीए) प्रमोद लहाळे यांच्या काही प्रकरणांची पुराव्यासह तक्रार १८ जूनला कृषी आयुक्तांकडे त्यांनी केली. यामध्ये शेतीशाळांच्या किट खरेदीत १.२० कोटीचा भ्रष्टाचार लहाळे यांनी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.


लहाळे यांच्या अनियमिततेच्या तीन तक्रारी आ. धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रधान सचिव (कृषी) विकासचंद रस्तोगी व कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्याकडे केल्या आहेत. या सर्व प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. लहाळे यवतमाळ येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी असताना जिल्ह्यातील शेतीशाळांचे किट खरेदीसाठी शासननियम डावलून ऑर्डर दिली. पुरवठादाराने किटमधील एकाही वस्तूचा पुरवठा न करता लहाळे यांना बिले दिले व पुरवठादारास २०२५ मध्ये ५० लाख, सन २०२४ मध्ये ७७ लाख रुपयांचे किट कागदावर खरेदी दाखवून १.२० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आ. धस यांनी तक्रारीत केला आहे.


मला माहिती पुरवित असल्याच्या संशयावरून काही अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे प्रस्ताव, विभागीय चौकशीचे प्रस्ताव शुल्लक कारणास्तव मंत्रालयात सादर करीत असल्याचा घणाघात आ. धस यांनी तक्रारीत केला. याबाबत जेडीए प्रमोद लहाळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आरोप नाकारले व याबाबत अधिक बोलण्यास नकार दिला. 


कृषी सहायक, पर्यवेक्षकांच्या बदल्यात भ्रष्टाचार

  • अमरावती जेडीए कार्यालयात स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी प्रशांत नाईक यांना अधीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला, व त्यांच्या माध्यमातून कृषी सहायकाचे बदलीसाठी १ लाख व कृषी पर्यवेक्षकासाठी २ लाख रुपये गोळा करण्यात आल्याचा आरोप आ. धस यांनी तक्रारीत केला आहे.
  • यवतमाळ जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानात २२ कोटींचा भ्रष्टाचार झाला., त्यामध्ये नाईक यांच्यावर ३.५० कोटींची वसुली काढण्यात आली. लहाळे यांनी तत्कालीन कृषिमंत्री यांना चुकीची माहिती देऊन नाईक यांची पदोन्नती एसएओ पदावर केल्याचा आरोप तक्रारीत आहे. नाईक यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहे.


"अमरावती जेडीए प्रमोद लहाळे यांच्यासंदर्भात मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून एसआयटी स्थापन करण्यासाठी निवेदन दिले आहे. चर्चा सकारात्मक झाली."
- सुरेश धस, आमदार

Web Title: Corruption of Rs 1.20 crore in purchase of kits for agricultural schools: MLA Suresh Dhas's allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.