एका कोरोनाग्रस्ताचा बुधबारी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:40 IST2020-12-17T04:40:08+5:302020-12-17T04:40:08+5:30

--------------------------------------------- बुधवारी ७० रुग्णांना डिस्चार्ज अमरावती : उपचारानंतर बरे वाटल्याने जिल्ह्यातील ७० रुग्णांना बुधवारी घरी सोडण्यात आल्याने जिल्ह्यात कोरोनामुक्त ...

A coroner died Wednesday | एका कोरोनाग्रस्ताचा बुधबारी मृत्यू

एका कोरोनाग्रस्ताचा बुधबारी मृत्यू

---------------------------------------------

बुधवारी ७० रुग्णांना डिस्चार्ज

अमरावती : उपचारानंतर बरे वाटल्याने जिल्ह्यातील ७० रुग्णांना बुधवारी घरी सोडण्यात आल्याने जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या आता १७,९४४ वर पोहोचली आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९५.७३ वर पोहोचल्याने दिलासा मिळाला आहे.

----------------------------------------------

रुग्ण दुप्पटीचा कालावधी २६६ दिवसांवर

अमरावती : अलीकडे रुग्णसंख्येत कमी आल्याने डबलिंगचा रेट आता २६६ दिवसांवर पोहोचला आहे. सप्टेंबर महिन्यात संसर्ग वाढल्याने हा कालावधी १५ दिवसांवर आला होता. मात्र, आता प्रतिबंधक उपाययोजनांमुळे रुग्णसंख्येत कमी आलेली आहे.

-------------------------------------------

वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण काढले

अमरावती : काही नागरिकांनी नाल्यांवर व घरासमोर मोठे रपटे बांधून अतिक्रमण केल्यामुळे वाहतुकीला अडथडा निर्माण झाला होता. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी काँग्रेसनगर, लघुवेतन कॉलनीतील अतिक्रमण काढण्याची कारवाई केली.

Web Title: A coroner died Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.