CoronaVirus News: अमरावतीमध्ये चार संक्रमित; शहरात तीन, ग्रामीणमध्ये एकाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 19:56 IST2020-06-29T19:56:19+5:302020-06-29T19:56:30+5:30
सर्व अहवाल नागपूर येथील एका खासगी लॅबद्वारे प्राप्त झाल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

CoronaVirus News: अमरावतीमध्ये चार संक्रमित; शहरात तीन, ग्रामीणमध्ये एकाची नोंद
अमरावती : येथील एका खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या चार रुग्णांचा अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आता ५४७ वर पोहोचली आहे.
महापालिका क्षेत्रात जमजमनगर (धर्मकाट्याजवळ) येथील ८२ वर्षीय महिला, बडनेराच्या जुनी वस्तीतील ६५ वर्षीय महिला, कृष्णानगर परिसरात ५५ वर्षीय व्यक्ती व धामणगाव रेल्वे येथील ७५ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे सर्व रुग्ण वलगाव मार्गावरील एका खासगी रुग्णालयात दाखल आहेत. हे सर्व अहवाल नागपूर येथील एका खासगी लॅबद्वारे प्राप्त झाल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.