coronavirus: अमरावतीमध्ये पुन्हा सापडले १४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, एकूण रुग्णसंख्या ३०४ वर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 20:14 IST2020-06-11T20:13:19+5:302020-06-11T20:14:19+5:30
रोज नव्या भागात कोरोनाग्रस्तांची नोंद होत असल्याने शहराची चिंता वाढली आहे.

coronavirus: अमरावतीमध्ये पुन्हा सापडले १४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, एकूण रुग्णसंख्या ३०४ वर
अमरावती - विद्यापीठाचे लॅबद्वारा गुरुवारी दोन टप्प्यात १४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ३०४ वर पोहोचली आहे. गुरुवारी आई-मुलगा, पती-पत्नी पॉझिटिव्ह निष्पन्न झाले. रोज नव्या भागात कोरोनाग्रस्तांची नोंद होत असल्याने शहराची चिंता वाढली आहे.
महापालिका क्षेत्रात बडनेरा जुन्या वस्तीमध्ये ४० वर्षांचे आईसह १८ वर्षाचा मुलगा, अकोली भागात ४२ वर्षाचे पतीसह ३४ वर्षांची पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. जमील कॉलनीत ५५ वर्षीय पुरुष, साबणपुºयात २८ वर्षीय तरुण, परतवाडा येथे ६३ वर्षीय व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. परतवाड्यातील संक्रमित व्यक्तीच्या पत्नी व मुलाचा अहवाल नागपूरला पॉझिटिव्ह आल्यानंतर गुरुवारी त्यांचा व त्यांच्याकडे घरकाम करणाºया ४२ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
दस्तूरनगरातील दत्त कॉलनी भागात ३७ वर्षीय महिला व पुरुष, जलाराम नगराजवळच्या प्रभा कॉलनीमधीळ ३८ वर्षीय पुरुष, ३१ वर्षीय महिला व १० वर्षांचे बालक तसेच कॅम्प भागातील ३६ वर्षीय सीआरपीएफचे जवानाचा अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आला आहे. बाधितांचे संपर्कातील व्यक्तींचा शोध आरोग्य यंत्रणेद्वारा घेतल्या जात आहे.