शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
2
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
3
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
4
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
5
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
6
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
7
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
8
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
9
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
10
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
11
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
12
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
13
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
14
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
15
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
16
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
17
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
18
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
19
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
20
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ

कोरोना ब्लास्ट, ग्रामीणमध्ये 110 गावे सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 5:00 AM

कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी हॉटस्पॉट असणारी आणखी काही गावे सील करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तालुकास्तरावर तहसीलदार, बीडीओ, तालुका वैद्यकीय अधिकारी याची अंंमलबजावणी करीत आहे. जिल्हा सीमेलगतची काही तालुके सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत. यासंदर्भात आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. प्राथमिक स्वास्थ्य केंद्रात कोरोना केअर सेंटर उघडण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.  

ठळक मुद्देमंगळवारी शहरात २४९, ग्रामीणमध्ये ९७४ रुग्णांची नोंद, कंटेन्मेंट वाढविणार : जिल्हाधिकारी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका क्षेत्रात वर्षभर धुमाकूळ घातल्यानंतर कोरोना संसर्गाची वक्रदृष्टी आता ग्रामीण भागाकडे वळली आहे. जिल्हा ग्रामीणमध्ये आतापर्यंत तब्बल ३१,४१३ रुग्ण व ५२१ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालेला आहे. मंगळवारी जिल्ह्यात १,१२३ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली, यात महापालिका क्षेत्रातील २४९ व ग्रामीणमधील ९७४ जणांचा समावेश आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये रुग्णांचे प्रमाण  सध्या ८७ टक्के आहे. त्यामुळे सर्वच तालुक्यांतील ‘हॉट स्पॉट’ असणारी ११० गावे सील करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ‘लोकमत’ला दिली.कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी हॉटस्पॉट असणारी आणखी काही गावे सील करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तालुकास्तरावर तहसीलदार, बीडीओ, तालुका वैद्यकीय अधिकारी याची अंंमलबजावणी करीत आहे. जिल्हा सीमेलगतची काही तालुके सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत. यासंदर्भात आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. प्राथमिक स्वास्थ्य केंद्रात कोरोना केअर सेंटर उघडण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.  ग्रामीणमध्ये संबादबंदीचे आदेश नावालाच आहे. जीवनावश्यक वगळता अन्य दुकानेही उघडली जात असताना स्थानिक प्रशासनासह पोलीस विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचेही दिसून आलेले आहे. कुठेही अटकाव होत नसल्याने, ग्रामीण यंत्रणा करते तरी काय, हा नागरिकांचा सवाल आहे. 

हे तालुके कोरोनाचे ‘हॉट स्पॉट’सध्या वरूड ४,८०८, अचलपूर ४,५७६, मोर्शी २,६२०, अंजनगाव सुर्जी २,४८२ व तिवसा २,३९१ रुग्णसंख्या असणारी तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत. याशिवाय अमरावती १,७४३,  चांदूर रेल्वे १,८४१, चांदूर बाजार १,८३१, धारणी १,८८२,  दर्यापूर १,६९३, धामणगाव १,९७२ नांदगाव खंडेश्वर तालुक्यात १,५७४ रुग्णसंख्या आहे. त्यातुलनेत भातकुली १,०५२ व चिखलदरा ९४८  या तालुक्यांत संसर्ग कमी आहे.

ग्रामीणमध्ये ५२१ संक्रमितांचा मृत्यूजिल्ह्यात आतापर्यंत १,०२५ संक्रमितांचा मृत्यू झालेला आहे. यापैकी ५२१ मृत्यू जिल्हा ग्रामीणमधील आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक (२ टक्क्यांपर्यंत) आहे. यामध्ये सर्वाधिक ८७ मृत्यू अचलपूर व ८५ वरूड तालुक्यात झाले आहे. चाचण्यांना उशीर व लक्षणे अंगावर काढणे याशिवाय कॉमार्बिडिटी आजार हे संक्रमितांच्या मृत्यूचे प्रमुख कारण असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

नागपूर, एमपीच्या सीमेलगत तालुक्यांत उद्रेकजिल्हा सीमेलगतच्या नागपूर, वर्धा मध्यप्रदेशात कोरोना संसर्गाचा उद्रेक झालेला आहे. तेथील रुग्ण अमरावती जिल्ह्यात उपचारासाठी येत आहेत. यासोबतच त्यांचे नातेवाईकदेखील जिल्ह्यात दाखल झाल्याने संसर्ग वाढला आहे. यामध्ये मध्यप्रदेश सीमेलगतचे अचलपूर्, धारणी अंजनगाच सुर्जी व चांदूरबाजार त्याचप्रमाणे नागपूर जिल्हा सीमेलगतचे वरूड, मोर्शी, वर्धा सीमेलगतच्या तिवसा, चांदूर रेल्वे व धामणगाव तालुक्यात ब्लास्ट झालेला आहे.

पीएचसीमध्ये उभारणार कोरोना केअर सेंटरग्रामीणमधील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आता मोठ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात  कोरोना केअर सेंटर उभारण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी दिले. याठिकाणी ३० ऑक्सिजन बेड राहणार आहेत. याशिवाय उपजिल्हा रुग्णालयातही ऑक्सिजन बेडची संख्या वाढविणार येणार आहे. 

या आठवड्यात ग्रामीणमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याने ११० गावे कंटेनमेंट करून सील करण्यात आले. आणखी यामध्ये काही गावांचा समावेश राहील. आता पीएचसीमध्येही कोरोना सेंटर उभारण्यात येणार आहे. तालुका ठिकाणी कोरोना हेल्थ सेंटर सुरू करण्यात येतील. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी नागरिकांनी त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करावे.- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या