अमरावती : जिल्ह्यात सोमवारी उपचारादरम्यान १५ रुग्णांचा मृत्यू झाल्याने संक्रमितांच्या मृत्यूची संख्या १,१३७ वर पोहोचली झाली, याशिवाय अन्य जिल्ह्यातील तीन रुग्णांचादेखील मृत्यू झालेला आहे. सोमवारी पुन्हा १,००५ संक्रमितांची नोंद झाली. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ७६,४४० झालेली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढताच आहे. सोमवारी ४,०९९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असताना त्यात २४.५४ टक्के पॉझिटिव्हिटी नोंद झालेली आहे. कोरोनाची साखळी खंडित व्हावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर संचारबंदीचे आदेश दिले आहेत. तसे पाहता १५ एप्रिलपासून जिल्ह्यात मिनी लॉकडाऊन सुरू असताना कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लाल्याने जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली आहे.
सोमवारी उपचारादरम्यान बरे वाटल्याने ९६५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. संक्रमणमुक्त नागरिकांची संख्या आता ६४,८१२ वर पोहोचली आहे. ही टक्केवारी ८४.७९ एवढी आहे. याशिवाय सातत्याने रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने रुग्ण दुपटीचा कालावधी सध्या ६६ दिवसांवर पोहोचला आहे.
बॉक्स
सोमवारी २४ तासांतील मृत्यू
(कृपया पाच ओळी जागा सोडावी)