कॉपी केल्यास गुन्हा! संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 18:34 IST2025-02-18T11:43:13+5:302025-02-18T18:34:21+5:30
Amravati : जिल्ह्यात आतापर्यंत तीन कॉपी प्रकरणाची नोंद

Copying is a crime! Sensitive exam centers will be monitored by drone cameras
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी, बारावीची परीक्षा कॉपीमुक्त घेण्यासाठी राज्य मंडळाने अनेक महत्वपूर्ण बदल केले आहेत. कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत असल्यामुळे नियमावली कडक केली आहे. परीक्षेत कॉपी करणारे किंवा गैरप्रकार करणारे व त्यांना मदत करणाऱ्यांवर दखलपात्र, अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
ज्या केंद्रावर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील अशा केंद्राची मान्यता पुढील वर्षापासून कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार आहे. सन २०१८ पासून झालेल्या बोर्ड परीक्षेत ज्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळले आहेत. त्या सर्व केंद्रावरील केंद्र संचालकांसह सर्व कर्मचारी बदलण्यात आले आहेत. संवेदनशील परीक्षा केंद्रावर प्रशासनातर्फे ड्रोन कॅमेराद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे.
हॉल तिकीट विसरले तरी पेपर देता येणार
परीक्षेला येताना विद्यार्थ्यांनी सोबत हॉल तिकीट आणणे आवश्यक आहे. हॉल तिकीट नसेल तर महाविद्यालयाचे ओळखपत्र, आधारकार्ड चालणार आहे.
बारावीची परीक्षा किती दिवस चालणार
बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरू झालेली आहे. शेवटचा पेपर १८ मार्चला होणार आहे. प्रत्येक पेपरनंतर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सुटी देखील देण्यात आल्या आहेत.
कॉपीसाठी सहकार्य करणारा ही गुन्हेगार
परीक्षेत कॉपी करणाऱ्या व त्याला मदत करणारा ही गुन्हेगार असून त्यांचेवर कारवाई केली जाणार आहे. अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाणार आहे.
दहावीची परीक्षा कधी ?
दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. दहावी परीक्षेचा शेवटचा पेपर १७ मार्चला होणार असून यावर्षी दहा दिवस अगोदर परीक्षा होत आहे.
कॉपी करणाऱ्यावर थेट
परीक्षेत विद्यार्थी कॉपी करताना आढळून आला तर बोर्डाच्या सूचनेनुसार त्यांच्यावर दाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
दुसऱ्या दिवशीही हॉल तिकीट आणलं नाही
परीक्षा येताना हॉल तिकीट आणणे अनिवार्य आहे. दुसऱ्या दिवशीही हॉल तिकीट नसेल तर सक्त सूचना केल्या जाणार आहेत.
कॉपीसाठी सहकार्य करणारा ही गुन्हेगार
परीक्षेत कॉपी करणाऱ्या व त्याला मदत करणारा ही गुन्हेगार असून त्यांचेवर कारवाई केली जाणार आहे. अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाणार आहे.
"कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबविण्यात येत असताना नियमावलीही कडक केली आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेचे दडपण न बाळगता तणावमुक्त परीक्षा द्याव्यात."
- निलीमा टाके, विभागीय सचिव अमरावती विभागीय मंडळ