अमरावतीत स्थानिक व्यावसायिकाकडून सॅनिटायझेशन चेंबरची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 07:33 PM2020-04-16T19:33:05+5:302020-04-16T19:34:02+5:30

हिंदुस्थान बॉडी मेकर संस्थेचे संचालक सलीम भाई यांनी कोरोना प्रतिबंधासाठी सॅनिटायझर चेंबरची निर्मिती केली आहे. त्यांनी हे चेंबर महिला बालकल्याण मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना भेट दिले आहे.  

Construction of sanitation chamber by a local businessman in Amravati | अमरावतीत स्थानिक व्यावसायिकाकडून सॅनिटायझेशन चेंबरची निर्मिती

अमरावतीत स्थानिक व्यावसायिकाकडून सॅनिटायझेशन चेंबरची निर्मिती

Next
ठळक मुद्देपालकमंत्र्यांकडून कौतुककोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी उपयुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी अनेक यंत्रणांकडून विविध स्तरांवर प्रयत्न होत असताना जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील नागरिकांचेही योगदान मिळत आहे. येथील हिंदुस्थान बॉडी मेकर संस्थेचे संचालक सलीम भाई यांनी कोरोना प्रतिबंधासाठी सॅनिटायझर चेंबरची निर्मिती केली आहे. त्यांनी हे चेंबर महिला बालकल्याण मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना भेट दिले आहे.  
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत असताना साधनसामग्री उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न होत आहेत. या संकटकाळात स्थानिक तंत्रज्ञ, संशोधक, तज्ज्ञांकडून स्थानिक पातळीवर विविध साधने, यंत्रणा निर्माण होण्यासाठी योगदान मिळत आहे, हे निश्चित आश्वासक आहे, असे ना. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी सॅनिटायझेशन करण्यास हे चेंबर उपयुक्त आहे. सहा फूट, तसेच चार फूट आकारात असे चेंबर बनविण्यात येत असून, त्याचा विविध ठिकाणी वापर करता येईल, असे सलीम भाई यांनी सांगितले.

Web Title: Construction of sanitation chamber by a local businessman in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.