शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

राकाँ, सेना, भाजप, भाकप कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश

By admin | Updated: December 22, 2016 00:32 IST

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्शी तालुक्यातील भाकपचे ज्येष्ठ कार्यकर्ते संजय मोहोकार ...

पक्षाला बळकटी : यशोमती, भय्यासाहेबांचे नेतृत्व अमरावती : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्शी तालुक्यातील भाकपचे ज्येष्ठ कार्यकर्ते संजय मोहोकार व राष्ट्रवादी काँग्रेसचे सूरज अवचार यांच्यासह तालुक्यातील शेकडो भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ काँग्रेस नेते भय्यासाहेब ठाकूर व आ. यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात प्रवेश घेतल्याने आता पक्षाची स्थिती अधिक भक्कम झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक तोंडावर आली आहे. काँग्रेस पक्षात इतर सर्व पक्षातील गणमान्य कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतल्याने काँग्रेसची स्थिती आता अधिकच मजबूत झाली आहे. बुधवारी आ. यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी पक्ष प्रवेशाचा हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आ. यशोमतींसह तालुक्यातील काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व ज्येष्ठ कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. काँग्रेसप्रवेशानंतर एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून पक्षासाठी एकदिलाने काम करणार असल्याची ग्वाही प्रवेशकर्त्यांनी दिली. काँग्रेसमध्ये प्रवेश घेणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये गजानन शार, राजेश पोहनकर, माजी सरपंच हरिभाऊ कावडे, नीलेश लाडवीकर, राजू धोंडे, संजय बुरंगे, नारायण टेकाम, ज्ञानेश्वर पांडे, शिवसेनेचे पवन राऊत, गजानन राऊत, सुनील गोबाडे, गजानन राऊत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन गावंडे, मुस्तफा भाई, नईम खान, माकपचे अरूण कमोजे, दिलीप खंबले, अफसर खाँ पठाण, नीलेश बेहरे आदींचा समावेश आहे. काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोेरणांवर विश्वास ठेऊन पक्षात आलेल्या लोकांचे स्वागत आहे. पुढे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे. इतर पक्षांमधून काँग्रेसमध्ये आलेल्या कार्यकर्त्यांमुळे काँग्रेसला बळकटी मिळेल आणि येणाऱ्यांचा विश्वासही सार्थ ठरेल. - यशोमती ठाकूर, आमदार, तिवसा