हतरू प्राथमिक आरोग्य केंद्रात गुंतागुंतीची प्रसूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:09 AM2021-06-11T04:09:27+5:302021-06-11T04:09:27+5:30

चिखलदरा : मेळघाटातील अतिदुर्गम भागात सुसज्ज आरोग्य यंत्रणेद्वारे गुंतागुंतीच्या प्रसूती यशस्वी होत आहेत. हतरू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नुकतेच ...

Complicated delivery at Hataru Primary Health Center | हतरू प्राथमिक आरोग्य केंद्रात गुंतागुंतीची प्रसूती

हतरू प्राथमिक आरोग्य केंद्रात गुंतागुंतीची प्रसूती

Next

चिखलदरा : मेळघाटातील अतिदुर्गम भागात सुसज्ज आरोग्य यंत्रणेद्वारे गुंतागुंतीच्या प्रसूती यशस्वी होत आहेत. हतरू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नुकतेच एका मातेने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला.

गत शनिवारी एक माता प्रसूतीसाठी दाखल झाली. मातेच्या उदरात जुळी मुले असल्याचे लक्षात येताच वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पंधराम यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रसूतिगृह कर्मचारी वर्गाला आवश्यक सूचना दिल्या व ही प्रसूती यशस्वीपणे पार पडली. औषधनिर्माण अधिकारी अनमोल शहा, आरोग्य सहायक अलका गावंडे, विठ्ठलराव गावंडे, अलका देशमुख, अस्मिता आठवले, किरण इंगळे, दीपिका आठवले, आशिष मुंडे, परिचय कोरडे आदी केंद्रात कार्यरत आहेत.

हतरू हे गाव अमरावती शहरापासून १३० किमी अंतरावर मध्यप्रदेश सीमेनजीक आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कर्मचारी वर्ग आरोग्य सेवेसाठी सतत कार्यरत आहे. प्रतिकूल परिस्थितीतही आरोग्य सेवेचा दर्जा चांगला राखण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. वीजपुरवठा खंडित होतो, हे लक्षात घेऊन तेथे सौर ऊर्जा उपकरणांचा वापर प्रकाशासाठी केला जातो. तेथील संस्थात्मक प्रसूतीचा दर चांगला असून, एप्रिल-मे महिन्यात ४० प्रसूती यशस्वीपणे पार पडल्या.

Web Title: Complicated delivery at Hataru Primary Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.