थंडीने अमरावती जिल्हा गारठला; तापमान ६.४ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 21:38 IST2020-12-21T21:38:35+5:302020-12-21T21:38:55+5:30
Amravati News Temperature Cold दोन दिवसांपासून तापमानात सातत्याने घट होत असल्याने अमरावती जिल्हा गारठला आहे. श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या तापमापक केंद्रावर रविवारी ६.४ अंश तापमानाची नोंद झाल्याची माहिती हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी दिली.

थंडीने अमरावती जिल्हा गारठला; तापमान ६.४ अंशावर
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दोन दिवसांपासून तापमानात सातत्याने घट होत असल्याने जिल्हा गारठला आहे. श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या तापमापक केंद्रावर रविवारी ६.४ अंश तापमानाची नोंद झाल्याची माहिती हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी दिली.
दिवसाचे तापमानातदेखील कमी आल्याने नागरिक उबदार कपडे घालूनच घराबाहेर पडत आहेत. हवेतदेखील आर्द्रता आहे. सायंकाळनंतर तापमानात एकदम घसरण होत असल्याने ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्या आहेत. २४ तारखेपर्यंत थंडीची लाट कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले. जिल्ह्यात १५ डिसेंबरला १८.५ अंश सेल्सिअस, १६ ला १४.८ अंश, १७ ला १३.६, १८ ला १३.००, १९ ला १२.८ व २१ तारखेला ६.४ या निच्चांकी तापमानाची नोंद झालेली आहे.