शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाचा विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2017 00:03 IST

इंग्रजी माध्यमाचे शिकवणी वर्ग घेणाऱ्या शिक्षकाने एका २० वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार शनिवारी मध्यरात्री उघडकीस आला.

सिंधी कॅम्प परिसरातील घटना : आरोपी मनोज पांडे पसारअमरावती : इंग्रजी माध्यमाचे शिकवणी वर्ग घेणाऱ्या शिक्षकाने एका २० वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार शनिवारी मध्यरात्री उघडकीस आला. पीडित विद्यार्थिनीने गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली असून आरोपी संचालक मनोज पांडे पसार झाला आहे. सिंधी कॅम्प परिसरातील क्रिएटिव्ह अ‍ॅकेडमीचे संचालक मनोज पांडे यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप आहे. २० वर्षीय पीडिताच्या तक्रारीनुसार, सदर मुलगी वाणिज्य शाखेचे शिक्षण घेते. जानेवारी २०१६ मध्ये सिंधी कॅम्प परिसरातील क्रिएटिव्ह अ‍ॅकेडमीत तिने लेखाकर्म (अकाऊंट) विषयासाठी शिकवणी वर्ग लावला होता. अ‍ॅकेडमीचे संचालक व शिक्षक मनोज पांडे हे ५० ते ६० विद्यार्थिनींना लेखाकर्म (अकाऊंट) विषय शिकवितो. त्यात पीडित मुलीचाही समावेश होता. मनोज पांडेची नजर त्या मुलीवर पडली. एके दिवशी शिकवणी वर्ग संपल्यानंतर मनोजने त्या मुलीला थांबण्याचा इशारा केला. ती नि:संकोचपणे थांबलीसुद्धा. त्यावेळी मनोज पांडेने तिला एका वर्ग खोलीत नेले आणि तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहून मुलगी निघून गेली. त्यानंतर तिसऱ्याच दिवशी मनोज पांडेने त्या मुलीच्या मोबाईलवर कॉल करून माझ्यासोबतचा तुझा अश्लील व्हिडीओ व्हायरल करेन, अशी धमकी दिली. तिला फ्लॅटवर बोलावून लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार वर्षभर सुरू राहिल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. हा गंभीर प्रकार त्या मुलीने तिच्या कुटुंबीयासमोर कथन केला. त्यांनी शुक्रवारी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांची भेट घेऊन सर्व प्रकार कथन केला. त्यानंतर पीडिताने तक्रार दिली. शनिवारी मध्यरात्री पीडित मुलीने गाडगेनगर पोलीस ठाण्यात मनोज पांडेविरुद्ध तक्रार नोंदविली. (प्रतिनिधी)पालकांनो सावधान, आणखी काही मुलींचे शोषणक्रिएटिव्ह अ‍ॅकेडमीचे संचालक मनोज पांडे यांच्याविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा आरोप एका विद्यार्थिनीने केला आहे. त्यांच्या शिकवणी वर्गात ५० ते ६० विद्यार्थिंनी इंग्रजीचे शिक्षण घेत आहेत. पांडेने आठ ते दहा विद्यार्थिनींवरसुद्धा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडित मुलीने केला असून त्या दिशेने गाडगेनगर पोलीस तपास करीत आहे.कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाने एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार शनिवारी प्राप्त झाली. त्या शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सद्यस्थितीत आरोपी पसार असून त्याचा शोध सुरू आहे. - कैलास पुंडकर, पोलीस निरीक्षक, गाडगेनगर पोलीस ठाणे