थकीत देयकांअभावी २२ पाणीपुरवठा योजना बंद

By Admin | Updated: April 26, 2015 23:54 IST2015-04-26T23:54:26+5:302015-04-26T23:54:26+5:30

जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट गडद होत असताना वीज देयकांची थकबाकी असल्यामुळे २२ पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत...

Closed water supply scheme due to inadequate payment of tired | थकीत देयकांअभावी २२ पाणीपुरवठा योजना बंद

थकीत देयकांअभावी २२ पाणीपुरवठा योजना बंद

फटका : नागरिकांची पाण्यासाठी वणवण
अमरावती : जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट गडद होत असताना वीज देयकांची थकबाकी असल्यामुळे २२ पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. जिल्ह्यातील एकूण एक हजार सहाशे पंधरा गावांपैकी १ हजार ५१४ गावांत पाणीपुरवठा योजनांतर्गत पाणीपुरवठा केला जातो. परंतु वेगवेगळ्या कारणांमुळे अनेक योजना बंद पडल्या आहेत. याचा फटका नागरिकांना बसत आहेत. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.
सध्या जिल्ह्यातील १४ पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील १ हजार ४८२ गावांमध्येच पाणीपुरवठा योजनेचे पाणी मिळत आहे. वीज देयकांची थकबाकी न भरल्याने जिल्हाभरात २२ ठिकाणच्या पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. तर देखभाल दुरुस्तीअभावी १० योजना सुरू नसल्याची माहिती आहे. मेळघाटातील २६ पाणीपुरवठा योजना बंद स्थितीत आहेत. देखभाल दुरूस्ती व थकीत वीज देयकाअभावी २६ योजना बंद पडल्या आहेत. चिखलदरा आणि धारणी तालुक्यातील गावांमध्ये ८११ हातपंप व ३०४ सार्वजनिक विहिरींच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा केला जात आहे. मात्र याबाबतीत प्रशासकीय यंत्रणा पाहिजे तशी दखल घेत नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. जिल्हाभरात ७ प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजना आहेत.

ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनेचे थकीत देयके वर्षोगिणती रखडले आहे. काही योजना देखभाल दुरुस्तीअभावी बंद पडल्या आहेत.
- श्वेता बॅनर्जी,
कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग.

Web Title: Closed water supply scheme due to inadequate payment of tired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.