शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

१२ हजार टीव्ही आजपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2017 00:26 IST

जिल्हा ग्रामीणमधील केबल जोडणीधारकांना २० जानेवारी २०१७ च्या अधिसूचनेन्वये ३१ मार्चपर्यंत सेटटॉप बॉक्स बसविणे अनिवार्य केले होते.

अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : ३१ मार्चला संपली मुदतअमरावती : जिल्हा ग्रामीणमधील केबल जोडणीधारकांना २० जानेवारी २०१७ च्या अधिसूचनेन्वये ३१ मार्चपर्यंत सेटटॉप बॉक्स बसविणे अनिवार्य केले होते. मात्र विहित मुदतीत १२ हजारांवर केबल जोडणीधारकांनी सेटटॉप बॉक्स न बसविल्यामुळे १ एप्रिलपासून त्यांचा टीव्ही बंद राहणार आहे. केबल टीव्ही डिजिटायझेशनचे नियमन केंद्र सरकारने ट्रायकडे दिले आहे. केबल व्यवसायात पारदर्शकता आणणे व सेवेत सुधारणा करणे हा यामागचा उद्देश आहे. फेज-चार अंतर्गत ३१ मार्चपूर्वी सेट टॉप बॉक्स बसविण्याचे निर्देश सूचना मंत्रालय नवी दिल्लीद्वारा देण्यात आल्या होत्या. जे बहुविध यंत्रणा परिचालक व केबल आॅपरेटर्स हे सेटटॉप बॉक्सशिवाय केबल सेवेचे प्रसारण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. डिजिटल सेटटॉप बॉक्सेस खरेदी करणे व तो ग्राहकांना पुरविणे ही जबाबदारी त्यांचीच आहे. बीआयएस स्टँडर्ड व्यतिरिक्त जोडणीखर्च अभिप्रेत आहे. मात्र याव्यतिरिक्त ग्राहकांजवळून अधिक रक्कम वसुली केल्यास कारवाई केली जाणार आहे. १ एप्रिलनंतर सेटटॉप बॉक्सअभावी केबल प्रसारण बंद पडल्यास किंवा सेट टॉप बॉक्सचा पुरवठा कमी पडल्यामुळे जनतेचा रोष निर्माण झाल्यास याविषयी केबल टेलीव्हिजन नेटवर्क अ‍ॅक्ट १९९५ नुसार कारवाई करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)अशी आहे जिल्ह्याची स्थितीफेज-३ मध्ये १५ गावांचा समावेश आहे. यामध्ये ४६ हजार ९३२ केबल जोडणी आहेत. यामध्ये ४५ हजार ६४७ सेट टॉप बॉक्स बसविण्यात आलेत. अद्याप १२८५ बसविणे शिल्लक आहे. ही ९५.२६ टक्केवारी आहे. फेज ४ मध्ये १२७३ गावे आहेत व ३० हजार ३०१ जोडणी संख्या आहे. आतापर्यंत १०,०५२ सेट टॉप बॉक्स लावण्यात आले आहे. अद्याप १२०१३ बसविण्यात यायचे आहे. यापूर्वी अधिसुचनेन्वये सेट टॉप बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या. ज्या केबल जोडणीधारकांनी सेट टॉप बॉक्स बसविला नाही त्यांचे प्रसारण १ एप्रिलपासून बंद होणार आहे. मनोरंजन व ज्ञान मिळविण्यासाठी सेट टॉप बॉक्स बसवून घ्यावे.- खुशालसिंग परदेशी, अप्पर जिल्हाधिकारी