शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

शहरात दुपट्ट्यांची 'क्रेझ'

By admin | Updated: July 4, 2016 00:08 IST

दिवसरात्र दुपट्टे बांधून फिरणाऱ्या तरुणाईमुळे शहराच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही वर्षांपासून

गुन्हेगारी फोफावणार ? : पोलीस प्रशासनाचे दुर्लक्षअमरावती : दिवसरात्र दुपट्टे बांधून फिरणाऱ्या तरुणाईमुळे शहराच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही वर्षांपासून शहरात दुपट्ट्याची 'के्रझ'च वाढली आहे. बेधूंद तरुणाई दुपट्टे बांधून फिरत असल्यामुळे त्याचा गैरफायदा गुन्हेगार घेऊ शकतात. मात्र, याकडे पोलीस विभाग दुर्लक्ष करीत आहे.उन्हापासून किंवा वाहनाच्या प्रदूषणापासून चेहऱ्याची सुरक्षा व्हावी, या उद्देशाने तरुणाई दुपटे बांधत असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र, आता केवळ दुपट्टे बांधण्याची के्रझच आली आहे. उन्हाळा संपून काही दिवस ओलांडून गेले आहेत. त्यामुळे उन्हाची तीव्रता कमी झाली आहे. त्यातच आता पावसाळा लागला असून आल्हाददायक वातावरण असल्याचे आढळून येते. मात्र, तरीसुद्धा दुपट्टे बांधणाऱ्याची के्रझ कमी झाली नसल्याचे दिसून येते. दिवसभर फिरणारी तरुणाई सायंकाळनंतरही दुपट्टे बांधताना आढळून येत आहे. शहरात सर्रासपणे तरुणाई दुपट्टे बांधत असल्यामुळे त्याचा गैरफायदा घेऊन गुन्हेगार प्रवृत्तीचे नागरिक गुन्हे करू शकतात. घराबाहेर निघणातानाच तरुणाई चेहरे दुपट्टे बांधतात. सुसाट वेगाने वाहने चालवितात. हा सर्व प्रकार पोलिसांच्या डोळ्यांदेखत सुरू असतो. मात्र, त्यांना आवर घालणाची जबाबदारी सांभाळणारे पोलीस बघ्यांची भूमिका घेतात. सद्यस्थितीत दुपट्टे बांधणाऱ्यांमध्ये मुलीचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून येते. मात्र, आता दुपट्टे बांधण्यात मुलांचेही प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले आहे. प्रत्येक चौक, रेल्वे स्थानक, बसस्थानक व अन्य अनेक सार्वजनिक ठिकाणी दुपट्टे बांधून उभी असणारी तरुणाई पोलिसांच्या दृष्टीस पडते. मात्र, दुपट्टा आड कोण लपले आहेत, याची शहानिशासुध्दा पोलीस करीत नाही. या दुपट्टयाआड गुन्हेगार आपली कामगिरी बजावू शकतो. यांची थोडीशीही भनक पोलिसांना नाही. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी हे पाऊल उचलणे आता गरजेचे झाले आहे. या दुपट्याआड गुन्हेगारी लपून राहू शकते, अवैध प्रकार होऊ शकते, गुन्हेगार एटीएममध्ये जावून पैसे काढू शकते, असे ना ना प्रकारचे गुन्हे घडण्यास चालना मिळू शकते. (प्रतिनिधी)प्रेमीयुगुलांमध्ये वाढते फॅडतरुण-तरुणी घरून निघताना दुपट्टे बांधूनच निघतात. शहरात एका ठिकाणी एकत्रीत येऊन प्रेमीयुगुल बिनधास्त फिरताना दिसतात. दुपट्टे बांधून प्रेमीयुगुल पळून जाण्यातही यशस्वी होतात. दुपट्टे बांधण्याच्या के्रझमधून तरुणी मुलींची छेडखाणीसुद्धा होऊ शकते. मात्र, दुपट्टे बांधणाऱ्या गुन्हेगारीची ओळख पटविणार तरी कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात मुली-महिलांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने दुपट्टा बांधणे हा प्रकार काही प्रमाणात ठिक आहे. मात्र आवश्यकता नसताना दुपट्टे बांधण्याचा प्रकार योग्य नाही. शहरात असे होत असेल तर दुपट्टा बांधणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल. तसे निर्देश पोलीस अधिकाऱ्यांना दिले जाईल. - दत्तात्रय मंडलिक,पोलीस आयुक्त.