शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

शहर बससेवेचे ‘आॅन दी स्पॉट’ इन्स्पेक्शन !

By admin | Updated: April 11, 2017 00:24 IST

‘पृथ्वी टुर्स अँड ट्रॅव्हल्स’ या खासगी अभिकर्त्याच्या माध्यमातून सुरू असलेल्या शहर बससेवेची आकस्मिक तपासणी होणार आहे.

उपायुक्तांच्या नेतृत्वात समिती : उपायुक्तांनी दिले आदेश अमरावती : ‘पृथ्वी टुर्स अँड ट्रॅव्हल्स’ या खासगी अभिकर्त्याच्या माध्यमातून सुरू असलेल्या शहर बससेवेची आकस्मिक तपासणी होणार आहे. आयुक्तांनी ही जबाबदारी उपायुक्त नरेंद्र वानखडे यांच्या नेतृत्वातील पथकाला दिली आहे. ‘शहर बस’ उपक्रम शहरातील सर्व मार्गांवर सुरळीत तसेच प्रभावीपणे सुरू असल्याची खात्री करण्यासाठी हे आदेश पारित करण्यात आले आहेत. अकोला येथील कंपनीशी असलेला करार संपुष्टात आल्यानंतर शहर बस वाहतुकीची जबाबदारी बिपिन चव्हाण यांच्या ‘पृथ्वी टुर्स अँड ट्रॅव्हल्स’वर सोपविण्यात आली. २५ मे २०१६ पासून ‘पृथ्वी टुर्स’च्या २५ शहरबसेसच्या माध्यमातून ही सेवा सुरू करण्यात आली. सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले. तथापि करारनाम्याप्रमाणे ‘पृथ्वी’ने अद्यापही छोट्या बस आणण्याच्या करारनाम्यातील अटींची पूर्तता केली नाही. दररोज होणार बसेसची तपासणीअमरावती : त्या २५ बसेसच्या माध्यमातून ‘पृथ्वी टुर्स अँड ट्रॅव्हल्स’ शहरबस वाहतूक उपक्रम सुरळीत चालवित आहे काय, याची तपासणी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. विशेष म्हणजे वानखडे यांच्या नेतृत्वातील हे पथक आकस्मिक पाहणी करेल. अभिकर्त्यांनी अधिकची तिकिटे छापली आहेत काय किंवा ‘एक्स्ट्रा टाईम’ वाहतूक होते का, याची तपासणी ‘आॅन दि स्पॉट’ होणार आहे. शहर बसवाहतूक अधिक सक्षम व्हावी, प्रवाशांच्या सोईच्या दृष्टीने ही बससेवा असून प्रवाशांची गैरसोय होऊ नये, अशा पद्धतीने दररोज या बसेसची तपासणी करावी व माहिती संकलित करून कार्यशाळा विभागाला द्यावी, असे आयुक्त हेमंत पवार यांनी स्पष्ट केलेरॉयल्टी शहर बससेवेच्या माध्यमातून महापालिकेला पृथ्वी ट्रॅव्हल्सकडून महिन्याकाठी ६ ते साडेसहा लाख रॉयल्टी मिळते. तुर्तास महापालिका हद्दीतील १६ रस्त्यांवर २५ शहरबसेस धावतात. ५.२२ रुपये प्रति किलोमीटर दराने मनपाला रॉयल्टी प्राप्त होत आहे. पथकात यांचा समावेश उपायुक्त (सामान्य) नरेंद्र वानखडे यांच्या नेतृत्वातील तपासणी पथकात पशुशल्य चिकित्सक सुधीर गावंडे, सचिन बोंद्रे, उद्यान अधीक्षक प्रमोद येवतीकर, उपअभियंता स्वप्निल जसवंते आणि निरीक्षक उमेश सवई यांचा समावेश आहे.