लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आपल्या मुलाचा अपघात झाला नसून त्याच्या पत्नीने तिच्या साथीदाराशी संगणमत करून त्याची हत्या केल्याचा आरोप सुरेश चोखोबा भितकर यांनी केला आहे. त्याअनुषंगाने या प्रकरणातील आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भितकर यांच्यासह राजुरा येथील शेकडो ग्रामस्थांनी केली आहे. सुधीर सुरेश भितकर असे मृताचे नाव आहे.सुधीर भितकर यांचा ३ सप्टेंबर रोजी अमरावती ते नांदगाव खंडेश्वर मार्गावरील जळू येथे अपघात होऊन मृत्यू झाल्याचे म्हटले जात असले तरी पूर्वनियोजित कट आखून त्याची पत्नी सपना सुधीर भितकर (२१) हिने आकाश राजकुमार शेलारे (२२, गजानननगर, नांदगाव खंडेश्वर) याच्या संगणमताने सुधीरची हत्या घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, सुधीर हा रेल्वेत चालक म्हणून मुंबई रेल्वेत कार्यरत होता. मात्र, त्याला पत्नीच्या अनैतिक संबंधानची माहिती मिळाल्याने त्या दोघांमध्ये खटके उडू लागले. सपना माहेरी गेली. दरम्यान सपनाने २८ जुलै रोजी सुधीरला नांदगाव खंडेश्वरला बोलावून घेतले. त्यानंतर सपना सुधीरला दुचाकीवर घेऊन अमरावतीला आली. जळू जनुनाजवळ तिने दुचाकी थांबविली. तेथे आकाश शेलारे त्याचे चारचाकी वाहन घेऊन आला. व दोघे मिळून सुधीरला गंभीर मारहाण केली. त्यानंतर अपघताचाद बनाव करण्यात आला. घटनेच्या दिवसानंतर आपली सून सपना ही सुधीरच्या मृत्यूबाबत उडवाउडवीचे उत्तर देत असलयाने आपल्याला सपना व आकाश या तिच्या सहकाऱ्याबाबत शंका निर्माण झाल्याचे म्हटले. याबाबत लोणीटाकळी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. मात्र, तेथील ठाणेदारांनी त्या तक्रारीची दखल घेतली नसल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.याशिवाय ठाणेदाराने या प्रकरणाची एफआयआरची प्रत देण्यास नकार दिला. त्याअनुषंगाने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी. दोन्ही गैरअर्जदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती सुरेश भितकर यांच्यासह सुरेखा डोंगरे, अर्चना वाल्मिके, ताराबाई वाघमारे, माधुरी उके, प्रमिला डोंगरे, देविका डोंमरे, संतोष डोंगरे, दीपा पोहनकर, ज्योती मेश्राम यांनी केली आहे.
मुलाचा अपघात नव्हे घातपात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 01:18 IST
आपल्या मुलाचा अपघात झाला नसून त्याच्या पत्नीने तिच्या साथीदाराशी संगणमत करून त्याची हत्या केल्याचा आरोप सुरेश चोखोबा भितकर यांनी केला आहे. त्याअनुषंगाने या प्रकरणातील आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भितकर यांच्यासह राजुरा येथील शेकडो ग्रामस्थांनी केली आहे.
मुलाचा अपघात नव्हे घातपात !
ठळक मुद्देवडिलांची तक्रार : ग्रामस्थांचा एसपी कार्यालयासमोर ठिय्या